टॉवरवर चढून तंटामुक्त अध्यक्षांची विरुगीरी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

लाडखेड : पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा खोटा असून तो मागे घेण्यात यावा, माझ्या विरोधात खोटी तक्रार देणार्‍यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पोलिस ठाण्याच्या परिसरात असलेल्या टॉवरवर चढून चाणी येथील माजी उपसरपंच तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रावण राठोड यांनी विरुगिरी केली.
 
चाणी (ता. दारव्हा) येथील माजी उपसरपंच तसेच तटामुक्ती अध्यक्ष श्रावण ढुमा राठोड (वय 45) यांच्या पुतणीचा चिकणी (ता.दारव्हा) येथे विवाह झाला आहे.

सासरची मंडळी त्रास देत असल्याने दोन दिवसापुर्वी श्रावण राठोड लाडखेड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. ठाण्यात आमची तक्रार घेण्यात आली नाही. उलट विरुद्ध पक्षाच्या तक्रारीवरुन माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, दोषीवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी तटामुक्ती अध्यक्ष श्रावण राठोड सकाळी सात वाजल्यापासून पोलिस ठाण्यात असलेल्या टॉवर चढून बसले. त्याला उतरवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांनी त्यांची समजूत काढत चौकशीअंती दोषीवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर तीन तासानंतर श्रावण राठोड यांना खाली उतरविण्यात यश आले. त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

खोटी तक्रार मागे घेण्यात यावी अशी आंदोलकांची मागणी होती. तपासाअंती कारवाई केली जाईल अशी विनंती राठोड यांना केल्याने ते खाली उतरले आहे.

- डॉ. नीलेश पांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, दारव्हा

Web Title: The demand for withdrawal of the crime by climbing towers