लाचेची मागणी करणारा पीएसआय एसीबीच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

अकोला : मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के अाणि त्यांचा रायटर शेंडे यांनी दहा हजाराची लाच मागितली. फिर्यादीच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता.27) प्रकरणाची पडताळणी केली असता उपनिरीक्षक म्हस्के अाणि रायटर शेंडे अाणि अाणखी एक पोलिस कर्मचारी लाचेची मागणी करताना अाढळून अाले. प्रकरणी तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

एका 45 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के अाणि त्यांचा रायटर शेंडे हे मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दहा हजार रूपयांची लाच मागत असल्याची तक्रार 22 नोव्हेंबर रोजी दिली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने मंगळवारी (ता.27) या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी फिर्यादीस पोलिस ठाण्यात पाठविले. तेव्हा पुन्हा पोलिस उपनिरीक्षक म्हस्के, रायटर शेंडे अाणि अाणखी एक पोलिस कर्मचारी पडताळणीदरम्यान लाच मागताना अाढळून अाले. यावेळी फिर्यादी खिशात मोबाईलवर रेकॉर्डिंग करीत असल्याचा संशय आल्याने तू रेकॉर्डिंग करतोस काय? असे विचारून अंगाला हात लावून चाचपणी करून शिवीगाळ केली. याप्रकरणी तीनही आरोपींविरोधात सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. ही कारवाई संजय गोर्ले, पोलिस निरीक्षक ईश्वर चव्हाण, गजानन दामोदर यांनी केली. 

'आयजी' शहरात अन् पोलिस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

येथील महिला तक्रार निवारण कक्षातील हिरकणी कक्ष अाणि प्रतिक्षालयाचे उद्घाटनासह वार्षिक अाढावा घेण्यासाठी पोलिस महानिरीक्षक श्रीकांत तरवळे शहरात अाले होते. पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी शहरात असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात पोलिस उपनिरीक्षक अडकल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले अाहेत. एकीकडे पोलिस महानिरीक्षक येणार म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात शहरातील सर्व ठाणेदारांनी हजेरी लावली होती. तेव्हाच सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अाणि त्यांचा रायटर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले.

Web Title: Demanding Bribe PSI is Arrested