मोदींची लढाई काळ्या पैशाच्या विरोधात : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

यवतमाळ : पाचशे व हजारच्या नोटा बंद करून मोदींनी काळ्या पैशांविरोधात लढाई सुरू केली आहे. या लढाईत त्यांनी आतंकवादी व नक्षलवाद्यांचा पैसा काळा केला आहे. तर, नकली नोटा बनविणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविला आहे. कर चुकविणाऱ्यांचे तोंड काळे केले आहे. यामुळे देशाच्या तिजोरीत साडेपाच लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यातून सर्वसामान्यांसाठी विविध योजना तयार होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

येथील समता मैदानावर शनिवारी नगरपालिका निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.

डिसेंबर 2017 पर्यंत राज्यातील 300 शहरे हागणदारीमुक्त करू तसेच पालिकेला विकासासाठी हवा तेवढा निधी देऊ. परंतु, पालिकेच्या कामकाजात गतिशीलता, पारदर्शकपणा व गुणवत्ता असली पाहिजे. यवतमाळला पाणीपुरवठा अमृत योजनेसाठी 283 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देत पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या मुद्रा, घरकुल व स्वच्छ भारत अभियान योजनेवर फडणवीस यांनी प्रकाश टाकला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, नगराध्यपदाच्या उमेदवार रेखा कोठेकर, अमोल डोणे, नगराध्यक्ष सुभाष राय, आमदार अशोक उईके, उद्धव येरमे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मदन येरावार यांनी केले. संचालन अमर दिनकर यांनी केले.

Web Title: Demonetisation is PM Modi's fight against Black money, says CM Devendra Fadnavis