बोनस मिळणार नसल्याने कर्मचाऱ्यांची निदर्शने 

बोनस मिळणार नसल्याने कर्मचाऱ्यांची निदर्शने 

सोनेगाव, डिफेन्स (जि. नागपूर) : पन्नास वर्षांपासून आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीपूर्वी उत्पादनावर आधारित बोनस दिला जात होता. पण यावर्षी सरकारने बोनस न दिल्याने कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. यामुळे नाजार झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून निदर्शने करून विरोध दर्शविला आहे. 
केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यात असंतोष वाढत आहे. या मुद्द्‌यावर संरक्षण मंत्रालय व केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी अंबाझरी डिफेन्स मधील सर्व कामगार संघटनांनी पुन्हा एकदा एकत्रित येत सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन व निदर्शने केली. डिफेन्स गेट समोर लाल झेंडा संघटनेचे पदाधिकारी बी.बी. मुजुमदार, गिरीश खाडे, विनोदकुमार, आशीष पाचघरे, विनोद रामटेके, दीपक गावंडे, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे बंडू तिडके, ओ.पी. उपाध्याय, संजय वानखेडे, हर्षल ठोंबरे, अतुल चवरे, इंटक संघटनेचे अरविंद सिंह, प्रवीण महल्ले, लोकशाही कामगार संघटनेचे जगदीश गजभिये, सुदर्शन मेश्राम, सतीश बागडे,वेदप्रकाश सिंह यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी संघटनेचे ध्वज घेऊन बोनसपासून वंचित केल्याने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र नारेबाजी केली. बोनस द्यावा अशी मागणी केली. विशेष म्हणजे भाजप विचारधारेची भारतीय मजदूर संघटनाही या कामगारांच्या हितार्थ आंदोलनात सहभागी झाली होती. आंदोलनकर्त्यांनी काळ्या फिती लावून आपला रोष व्यक्त केला. 

फक्त 39 दिवसांचा बोनस मिळणार 
गेल्या पन्नास वर्षांपासून आयुध निर्माणीच्या उत्पादनावर आधारित दरवर्षी दिवाळी दस्‌याच्या अगोदर बोनस वाटप केले जात होते. पण विद्यमान सरकारने 39 दिवसाचा बोनस देण्याची केवळ घोषणा केली. दिवाळी तोंडावर असतांना बोनस न मिळाल्याने सण साजरा कसा करायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे, कामगार नेत्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com