आंदोलक होमगार्डसची मुस्कटदाबी

file photo
file photo

नागपूर : आंदोलन, मोर्चा, उपोषण व बेशिस्त वर्तनामुळे सेवा समाप्त केलेल्या होमगार्डसना संघटनेत सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे. मात्र, संघटनेत सामावून घेतल्या जाणाऱ्या स्वयंसेवकांना भविष्यात कोणत्याही संघटनेचा सभासद होता येणार नाही. तसेच आंदोलन, मोर्चे व उपोषणात भाग घेणार नाही, अशी अट टाकली आहे. भविष्यात आंदोलनात सहभागी झाल्यास कारवाईस पात्र राहील, असे हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे.
नॅशनल होमगार्ड पोलिस असोसिएशनच्या माध्यमातून राज्याचे महासचिव नामदेव खानझोडे यांनी वर्धा येथे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर येथील संविधान चौकात अर्धनग्न, भीख मांगो, लोटांगण आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे सरकारने आंदोलनकर्त्या होमगार्डसवर गुन्हे दाखल केले होते. तसेच त्यांची सेवा समाप्त केली होती. आंदोलनाची सरकारने दखल घेतल्यानंतर आंदोलनकर्त्या होमगार्डसना पुन्हा सेवेत घ्यावे यासाठी "दै. सकाळ'ने पाठपुरावा केला होता. सरकारने त्याची दखल घेतली आणि होमगार्डचे महासमादेशक संजय पांडे यांनी आंदोलनकर्त्या होमगार्डला सेवेत समावेश करण्याबाबत सूचना काढल्या आहेत. तत्पूर्वी, आंदोलन व मोर्चे यात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना संघटनेत सेवा करण्याची संधी देऊन वस्तुस्थिती पडताळण्यात आली.
एक मार्च 2019 रोजीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार होमगार्डसकडून माफीनामा घेऊन सेवेत संधी देण्याचे नमूद केले आहे. त्यानुसार होमगार्डला विशेष बाब म्हणून संधी दिली जात आहे. संबंधित होमगार्डना संघटनेत सामावून घेण्याबाबत स्पष्ट अभिप्रायही समादेशकांना देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. सर्व अर्ज 15 ऑगस्ट 2019 पर्यंत मुख्यालयात सादर करायचे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com