मंदी, महागाईविरोधात निदर्शने 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

उमरेड  (जि.नागपूर) :  केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरात आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे व्यवसाय आणि सेवा ठप्प पडल्या आहेत. त्याचा विपरीत परिणाम राज्यातील युवक, शेतकरी, शेतमजूर तसेच समाजातील गरीब मागासवर्गीय, अल्पसंख्याक, रेषेखालील लोकांना सहन करावा लागत आहे, असा आरोप नगर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने यावेळी करण्यात आला. 

गेल्या सत्तर वर्षांत भारतात कधी नव्हे, अशी परिस्थिती आल्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष राजकुमार यांनी नुकतेच सांगितले. मध्यमवर्गीयांना उत्पन्नवाढीसाठी खासगी क्षेत्राला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्याचा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे, असे मत कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्याने व्यक्‍त केले. उमरेड विधानसभाक्षेत्रातील जनता आर्थिक मंदीच्या संकटात सापडली आहे. स्थानिक शेतकऱ्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच आर्थिक मंदीचा फटका बसला असल्याचे कॉंग्रेसकडून वर्तविण्यात आले. पाच वर्षांपूर्वी राज्यावर दोन लाख कोटी कर्ज होते; परंतु ते पाच वर्षांनंतर पाच लाख कोटींवर गेले असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारच्या अनेक समस्या आणि अडचणी घेऊन नगर कॉंग्रेस कमिटीतर्फे निवेदनाच्या माध्यमातून तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार हाटकर यांना निवेदन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, सुधाकर खानोरकर, संजय मेश्राम, राजू पारवे शुभम गिरडकर, सूरज इटनकर, केतन रेवतकर, धीरज यादव, गुणवंत मांढरे, अमित लाडेकर, जितू गिरडकर, मनीष शिंगणे आदी उपस्थित होते.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demonstrations, protests against inflation