नागपूर : मेयोतील निवासी डॉक्टरांनाचा डेंगीची लागण

नागपूर : मेयोतील निवासी डॉक्टरांनाचा डेंगीची लागण

नागपूर : मेयो ५० हून अधिक निवासी डॉक्टर व विद्यार्थ्यांना डेंगी झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची तपासणी केली असता कूलरमध्ये डेंगीच्या अळ्या आढळून आल्या. या विभागाने फॉगिंग व कीटकनाशक फवारणी केली.

उपराजधानीत डेंगीचे 256 वर गेली आहे. एकट्या मेयोमध्ये डेंग्यूचे ६०वर रुग्ण उपचार घेत आहे. निवासी डॉक्टर व विद्यार्थी डेंग्यूवर उपचार घेत आहेत. याची दखल आरोग्य विभागाने घेतली. मंगळवारी मुलांच्या वसतिगृहाची पाहणी केली असता कूलरमध्ये अळ्या आढळल्या. कीटकनाशक फवारणी करण्यात आली. विभागाच्यावतीने प्रत्येक खोलीमध्ये जाऊन कोल्ड फॉगिंगही करण्यात आले.

अधिकाऱ्यांच्या मते, वसतिगृहातील बहुसंख्य कूलर्स खिडक्यांवर लावण्यात आले आहे. तिथे पोहचणे कठीण असले तरी पाण्यात डासांच्या अळ्या दिसून येतात. यामुळे हे कूलर काढणे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल. मेडिकलच्या बालरोग विभागात 35 डेंगीसह विविध आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com