नागपूर शहरात डेंगीचा प्रकोप वाढला 

Dengue in Nagpur city
Dengue in Nagpur city

नागपूर - शहरात डेंगीचा प्रकोप वाढला असून, 15 दिवसांत 12 रुग्णांची महापालिकेने नोंद केली. त्यामुळे डासांचा उपद्रव असलेल्या शहराच्या विविध भागात औषध फवारणी करण्याचे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. 

सध्या शहरात डेंगीला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे डेंगीचा प्रसार करणाऱ्या डासांची संख्याही वाढली आहे. डेंगीवरील नियंत्रणासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. परंतु, या उपक्रमांचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्यात डेंगीचे 13 रुग्ण आढळले. ऑगस्ट महिन्यात आजपर्यंत 12 रुग्ण आढळल्याचे सभापती कुकरेजा यांनी नमूद केले. महापालिकेचे 135 अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे औषधी फवारणीची जबाबदारी आहे. या सर्वांना डेंगीवर नियंत्रणासाठी डास असलेला भाग निश्‍चित करून औषध फवारणी करण्यासाठी दिवस ठरविण्याचे निर्देश बैठकीत दिल्याचे ते म्हणाले. डेंगीच नव्हे तर मलेरिया आदींचेही रुग्ण सध्या घराघरांत दिसून येत आहे. फॉगिंग मशीन या डासांसाठी कुचकामी ठरल्या आहेत. मात्र, केवळ नागरिकांपुढे देखाव्यासाठीच या मशीनचा उपयोग होत आहे. मोकळ्या भूखंडांचा प्रश्‍न कायम आहे. केवळ चर्चेसाठीच मोकळ्या भूखंडांचा विषय काढला जात असल्याचेही चित्र आहे. 

बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश 
कामठी रोडवरील भारत टॉकीज जवळ बिल्डरने इमारत बांधकाम सुरू केले. या इमारत बांधकामाच्या खोदकामात महापालिकेची ट्रंक लाइन फुटली. त्यामुळे या बिल्डरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. परंतु, गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सभापती कुकरेजा यांनी बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्याचे निर्देश प्रशासनाला दिला. येथे मेट्रोचे कामही सुरू आहे. त्यामुळे तत्काळ महामेट्रोच्या सहकार्याने ट्रंक लाइन दुरुस्तीची कामे केल्याचे कुकरेजा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com