हे चाललय तरी काय? डेंगीचा उद्रेक अन्‌ महापालिका झोपेत! 

हे चाललय तरी काय? डेंगीचा उद्रेक अन्‌ महापालिका झोपेत! 

नागपूर - नागपुरात स्वाइन फ्लू, स्क्रब टायफस व डेंगीचा कहर सुरू आहे. उत्तर नागपुरातील मिसाळ ले-आउट परिसरात घरोघरी डेंगीचा रुग्ण आढळून येत आहे. मात्र, महापालिकेचा आरोग्य विभाग साखर झोपेत आहे. निवडणुकीच्या कामात गुंतला असून, जनतेचे आरोग्य धुऱ्यावर सोडल्याची चर्चा परिसरात आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग डेंगीमुळे अनुचित घटना घडायच्या प्रतीक्षेत आहे का, असा सवाल नागरिकांनी केला आहे. 

नागपूर जिल्ह्यासह शहरात बदलत्या वातावरणामुळे स्क्रब टायफसपासून तर मलेरिया, स्वाइन फ्लू आणि डेंगीचा उद्रेक आलटून पालटून सुरू झाला आहे. जानेवारीपासून तर आतापर्यंत शहरात 266 जणांना डेंगीची लागण झाली आहे. विशेष असे की, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात 144 डेंगीग्रस्त असल्याचे आढळले. ऑक्‍टोबर महिन्याच्या 15 दिवसांत 80 पेक्षा अधिक डेंगीग्रस्त आढळल्यानंतरही महापालिकेचा आरोग्य विभाग सुस्त आहे. शहरात साथीच्या आजारावर नियंत्रणाची तसेच उपचाराची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. परंतु, शहरात केवळ डेंगीच्या अळ्या शोधमोहीम सुरू आहे. प्रभावी उपचाराची यंत्रणा महापालिकेच्या आरोग्य विभागाजवळ नसल्यामुळे डेंगीचा उद्रेक वाढत आहे. असे महापालिकेचे निवृत्त अधिकारी सांगतात. 

एकाच गल्लीत सात जणांना डेंगी 
उत्तर नागपुरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकाच गल्लीतील सात लोकांना डेंगीचा आजार झाल्याचे सांगण्यात आले. मिसाळ ले-आउट गल्ली क्र. तीनमध्ये डेंगीचा डंख अतिशय प्रभावी दिसून येत आहे. महापालिकेची आरोग्य केंद्र आजारी असल्यामुळे खासगी रुग्णालयांशिवाय पर्याय नाही, असे चित्र येथे आहे. अमोल वासुदेव खांडेकर, विवेक वासुदेव खांडेकर, रूतिका सुजय मेश्राम अशी काही रुग्णांची नावे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com