कन्हानमध्ये डेंगीचा रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

टेकाडी (जि. नागपूर) : कन्हान, पिपरी नगर परिषद प्रभाग दोनअंतर्गत निशा पासपलवार (ता. 18) या युवतीला डेंगी झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे क्षेत्रात नगर परिषद प्रशासनाची अकार्यक्षम प्रणाली पुन्हा ऐरणीवर आली आहे. वसाहतींमधील रिकाम्या भूखंडांमध्ये पावसाच्या पाणी तसेच सांडपाण्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

निशावर काही दिवसांपासून कामठी स्थित खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती बरी होत नसल्याने रुग्णालयात काही तपासण्या केल्या असता डेंगी झाल्याचे 13 सप्टेंबरला पुढे आले. सोबत पुढे आला नगर परिषदेचा निष्काळजीपणा. कन्हान पोलिस ठाण्यासमोर असलेला गांधी चौक जिथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डासांची संख्या वाढून स्थानिकांना हिवताप, डोकेदुखी, शरीर दुखणे, सर्दी, खोकला सारख्या रोगांची लागवण होण्याची शक्‍यता आहे. क्षेत्रात गौपालक असल्याने जनावरांची संख्या मोठी आहे. क्षेत्रात डासांच्या विल्हेवाटीवर नगर परिषदेने, स्वच्छता व आरोग्य विभागाने आवर्जून लक्ष्य देण्याची मागणी होत आहे. युवतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती बरी असल्याची माहिती आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue patient in Kanahan