डेंगीने घेतला प्रसूत महिलेचा बळी

file photo
file photo

श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : डेंगी आजार झालेल्या महिलेचा प्रसूतीनंतर नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. 12) सायंकाळदरम्यान घडली. तृप्ती सुधीर गाढवे (वय 32) असे मृत महिलेचे नाव आहे.
गर्भवती तृप्ती गाढवे हिला गेल्या आठ दिवसांपूर्वी ताप आल्याने पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारामुळे तब्येतीत सुधारणा होत नसल्याने तिला सावंगी (मेघे) येथे उपचारासाठी दाखल केले. रक्ताच्या चाचणीत पेशी कमी होण्याबरोबरच महिलेला डेंगीची लागण झाल्याचे निदान डॉक्‍टरांनी केले. डेंगीच्या आजारामुळे प्रसूती करणे अवघड जाईल, त्यामुळे नागपूर येथील वैद्यकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला तज्ज्ञडॉक्‍टरांनी दिला. तेथील डॉक्‍टरांनी महिलेवर उपचार करून प्रसूती केली. परंतु, प्रसूतीनंतर तिचा मृत्यू झाला. नवजात बालिकेवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तृप्तीवर अमरावती जिल्ह्यातील जामगाव येथे रविवारी (ता.13) अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुटुंबातील महिलाही आजारी
श्रीरामपूर येथील गाढवे कुटुंबातीलच स्वाती या महिलेला डेंगीची लागण झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रक्तपेशी कमी होण्याबरोबरच गावात डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. ग्रामपंचायतसह आरोग्य विभागाने योग्य उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com