esakal | शहरातील डेंटल क्लिनिक बंद!

बोलून बातमी शोधा

Dental clinic closed in Akola city

शहरासह जिल्ह्यातील खासगी रुग्णालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, तरीही शहरातील बहुतांश दातांचे दवाखाने बंद असल्याची माहिती आहे. तेव्हा याकडेही आरोग्य प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरातील डेंटल क्लिनिक बंद!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूच्या भीतीने शहरातील काही खासगी रुग्णालये बंद होती. मात्र, शनिवारी (ता.२८) जिल्हा प्रशासनाची आयएमएसोबत झालेल्या बैठकीनंतर शहरासह जिल्ह्यातील खासगी रुग्णालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, तरीही शहरातील बहुतांश दातांचे दवाखाने बंद असल्याची माहिती आहे. तेव्हा याकडेही आरोग्य प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोरोना विषाणूचा जगभर कहर पाहता सर्वसामान्य नागरिकांसह वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज डॉक्टरांमध्येही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच काही जणांनी त्यांचे रुग्णालये बंदही ठेवली होती. यात सर्वाधिक प्रमाण हे दातांच्या दवाखान्यांचे आहे. यावर अनेकांनी टिका केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने शनिवारी आयएमएसोबत बैठक बोलावली होती. यामध्ये खासगी डॉक्टरांनी त्यांच्या भीतीचे काही कारणे सांगितले. त्या सर्व समस्यांचे निरसन केल्यानंतर खासगी रुग्णालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, तरीही शहरातील बहुतांश डेंटल क्लिनिक बंद असल्याची स्थिती आहे.

खासगी डॉक्टरांच्या घरपोच मिळणार सॅनिटायझर
शनिवारी झालेल्या बैठकीत काही खासगी डॉक्टरांनी मास्क, सॅनिटायझर, हॅंडवॉशचा तुटवडा असल्याने मिळत नसल्याचे सांगितले. त्यानुसर अशा डॉक्टरांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांना घरपोच या सर्व वस्तू देण्यात येणार आहेत. अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

असा काही प्रकार आढळल्यास त्या डेंटल क्लिनिकला नोटीस पाठविण्यात येईल. त्यानंतरही त्यांनी दवाखाना सुरू न केल्यास त्यांचे नियमानुसार रजिस्ट्रेशन रद्द केले जाईल.
-डॉ. फारूक शेख, वैद्यकीय अधिकारी, मनपा, अकोला.

शनिवारी झालेल्या बैठकीत सर्व खासगी रुग्णालये सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही डेंटल क्लिनिक बंद आढळल्यास त्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
-संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकीर, अकोला.

सर्वोपचार रुग्णालयातील दातांची ओपीडी सुरू आहे. तर ग्रामीण भागातील सर्वच शासकीय रुग्णालयात दातांची ओपीडी सुरू ठेवण्याच आदेश आहेत. त्यानुसार सर्वच ठिकाणी ओपीडी सुरू आहे.
-डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.