देवरी : वरुणराजाने केली निवडणूक यंत्रणेची फसगत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

देवरी (जि. गोंदिया) : सोमवारी होणाऱ्या आमगाव विधानसभा मतदारसंघातील मतदानासाठी पोलिंग पथकाची रवानगी रविवारपासून सुरू झाली. मात्र अचानक बरसलेल्या वरुणराजाने निवडणूक यंत्रणेची चांगलीच फसगत केल्याची प्रचिती देवरी येथे आली. अचानक उद्‌भवलेल्या या घटनेने निवडणूक यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली.

आमगाव विधानसभेसाठी सोमवारी मतदान होणार आहे. यासाठी देवरी येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्थानिक औद्यागिक प्रशिक्षण केंद्रात कक्ष स्थापन केले आहे. या ठिकाणाहून सर्व निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. या मतदारसंघातील 310 मतदान केंद्रांवर पोलिंग पथक रवाना करण्याचे असल्याने सर्व कर्मचारी आणि वाहन येथे एकत्रित करण्यात आले. मात्र, ऐनवेळी पावसाच्या धारा कोसळल्याने येथे चिखल झाला. या चिखलात वाहने अडकली. त्यामुळे निवडणूक यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. तथापि, उशिरा हायड्रासारखी मशिन बोलावून चिखलात फसलेल्या बसेस काढून पोलिंग पथक रवाना करण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत केवळ दोन-तीन पथक रवाना करण्यात आल्याची माहिती मिळाली. यामुळे पोलिंग पथकाला आपल्या स्थानी पोहोचण्यास उशीर होत आहे. परिणामी, केंद्रावर पोहोचल्यानंतर होणाऱ्या त्रासापोटी पोलिंग पथकातील कर्मचारी नाराजी व्यक्त करीत होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deori : monsoon cheats election system