कोरची तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज योजनेपासून शेतकरी वंचित

नंदकिशोर वैरागडे
सोमवार, 4 जून 2018

महाराष्ट्र माळ शासनाने मोठा गाजावाजा करून शिवाजी छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजना 2017 मध्ये अंमलात आणली पण ही योजना शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे.

कोरची - गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम कोरची तालुक्यात महाराष्ट्र शासनाने श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्ज योजनेचं लाभ कोरची तालुक्यातील बँक ऑफ इंडियामध्ये 600 खातेदारांपैकी 200 खातेदारांना लाभ मिळाला असून 400  खातेदार या योजनेपासून वंचित झालेले आहेत.

महाराष्ट्र माळ शासनाने मोठा गाजावाजा करून शिवाजी छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजना 2017 मध्ये अंमलात आणली पण ही योजना शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे. शेतकरी आज ना उद्या माझ्या कर्जमाफी म्हणून शासनाची आतुरतेने वाट बघत आहे. पण या योजनेचा पैसा गेल्या चार महिन्यांपासून बँकेमध्ये येत नसल्याने या योजनेचा पैसा कर्जदार शेतकऱ्यांमध्ये टाकण्यास बँक नाही ही योजना सुरू केली म्हणून शेतकरी 2017 च्या घरी खरीप हंगामामध्ये बँकेकडून कर्ज न घेता कशीतरी शेती शेतीचा हंगाम केला. पण मावा तुडतुडे आणि शेतकऱ्यांना पूर्णपणे वेटीस धरण त्यामुळे शेतकऱ्यांना 2017 मध्ये एकटी घेता आले नाही आणि पंतप्रधान पिक विमा योजनेत भाग घेता आले नाही. त्यामुळे शेतकरी शेतकरी दोन्ही बाजूने वंचीकरण 2018 मध्ये तरी शिव छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळेल, या आशेने शेतकरी वाट बघत असताना हंगामाचे दिवस येऊन गेले तरी या योजनेचा पैसा बँकेत येत नसल्याने बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देऊ शकत नाही.

तालुक्यात दीड लाखापर्यंत कर्ज असलेले शेतकरी तीनशे ते साडेतीनशे आहेत. तर बोटावर मोजण्याइतकेच शेतकरी दीड लाखाच्या वरील कर्जदार आहेत. या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यास पुढील हंगाम करण्यासाठी सोयीचे होईल. शेतकऱ्यांना वेठीस धरून महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्याचा खेळ मांडला आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून समोर येत आहे.

आज न उद्या माझी कर्जमाफी होईल या आशेवर असलेल्या शेतकरी हंगामाच्या तयारीसाठी लागलेला आहे. एकतर कर्जमाफी होत नाही, बँक पिक कर्ज देत नाही, अशा द्विधा मनस्थितीत सापडलेल्या शेतकरी काय करावे, असा अशा विवंचनेत सापडलेला आहे. तरी मायबाप सरकारने या योजनेचा पैसा तात्काळ देऊन शेतकर्‍यांना कर्ज मुक्त करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

कर्नाटकमध्ये काल परवा सत्तेत आलेल्या सरकारने शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्ती पंधरा दिवसात या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचे ठरवले असताना महाराष्ट्र प्रशासनाने मात्र गेल्या दोन वर्षांपासून या योजनेचा पूर्णपणे एकतारा लावू शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारने अभ्यास कोणता करतो हे एक कोडेच आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Deprived the farmer from Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojna