वंचित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे काय?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सुरू केलेल्या पदव्युत्तर परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बरेच विद्यार्थी नोंदणीपासून वंचित राहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यातूनच एम. कॉमसारख्या अभ्यासक्रमात गतवर्षी गर्दी असताना, यावर्षी त्यात बऱ्याच जागा रिक्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रक्रियेपासून माहितीअभावी चारही जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नव्याने संधी कशी मिळणार, असा प्रश्‍न महाविद्यालयांकडून होताना दिसून येत आहे. 

विद्यापीठाकडून एम. कॉमसह पाच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ८ जूनपासून नोंदणीस सुरुवात केली. यापैकी एमएफए (मास्टर ऑफ फाइन आर्ट) या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया मध्येच थांबविली. मात्र, पदव्युत्तर प्रवेशप्रक्रियेची माहिती नसल्याने पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेचे अर्ज भरलेले नाहीत. 

विशेष म्हणजे या अभ्यासक्रमांप्रमाणेच प्रक्रियेतील इतर अभ्यासक्रमांतही विद्यार्थी बऱ्याच प्रमाणात वंचित राहण्याची शक्‍यता आहे. याबद्दल बऱ्याच महाविद्यालयांसह, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे तक्रार केलेली आहे.

विद्यापीठाकडून यावर दोन प्रवेश फेरीनंतर १७ जुलैपासून रिक्त जागांसाठी महाविद्यालयांसाठी तिसऱ्या आणि समुपदेशन फेरीचे आयोजन करण्यात येईल, असे नमूद करण्यात येत आहे. मात्र, पदव्युत्तर प्रवेशप्रक्रियेच्या नियमावलीत असे कुठेही नमूद करण्यात आलेले नाही. तसे करावयाचे असल्यास विद्यापीठाला त्यात सुधारणा करावी लागणार आहे. विशेष म्हणजे अद्याप यासंदर्भात अधिकृत कुठलेही परिपत्रक आलेले नाही.

त्यामुळे वंचित विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे पदव्युत्तर प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहण्याची भीती आता निर्माण झालेली आहे.

मनपसंत महाविद्यालयांपासून वंचित राहणार 
पहिल्या टप्प्यात पात्र विद्यार्थ्यांकडून विभाग आणि नामवंत महाविद्यालयातील जागांवर प्रवेश देण्यात येणार येईल. त्यामुळे माहितीअभावी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. आता १७ जुलैपासून सुरू होणाऱ्या महाविद्यालय आणि विभागाच्या प्रवेशादरम्यान मनपसंत महाविद्यालय वा विभागाच्या प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे.

Web Title: Deprived Student Admission education