उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

file photo
file photo

यवतमाळ : गैरव्यवहार प्रकरणातील कारवाई टाळण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद नरेगाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह एका कंत्राटी कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. जिल्हा परिषदेतील नरेगा कार्यालयात गुरुवारी (ता.3) ही कारवाई करण्यात आली.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) मनोहर नाल्हे आणि पांढरकवडा पंचायत समितीतील सहायक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी) प्रवीण हुलके असे ताब्यात घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्याचे नाव आहे. पांढरकवडा पंचायत समितीअंतर्गत सिमेंट नाली बांधकाम व सार्वजनिक विहिरीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. गैरव्यवहाराची रक्कम वसूल न करणे व मग्रारोहयो 2005 च्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई न करण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. त्यापैकी पहिला हप्ता दहा हजार रुपये देण्याचे ठरले. अशी तक्रार तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार गुरुवारी जिल्हा परिषदेच्या नरेगा कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी दहा हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारताना दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com