संत चोखामेळा पुरस्कार सत्यपाल महाराजांना जाहीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

देऊळगावराजा - शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने दलित विद्रोही संत चोखामेळा यांच्या नावाने प्रथमच दिला जाणारा सन्मानाचा पुरस्कार सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांना घोषित करण्यात आला. संत चोखामेळा जन्मस्थळी या राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा आज राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केली.

संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील संत चोखामेळा यांच्या नावाने राज्यातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्‍तींना पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय विभागामार्फत दरवर्षी राज्यातील एका व्यक्‍तीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. समाजप्रबोधनाच्या माध्यमाने गत अनेक वर्षांपासून जनजागृती करणारे सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांना संत चोखामेळा राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणाही त्यांनी केली. यापूर्वी सत्यपाल महाराजांना राज्य शासनाच्या वतीने व्यसनमुक्ती पुरस्कार, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दलितमित्र पुरस्कार; तसेच अमेरिकेतील समाजप्रबोधन पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

Web Title: deulgavraja vidarbha news sant chokhamela award give to satyapal maharaj