साहित्य संमेलनासाठी जबरी वसुली : देवानंद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

यवतमाळ : यवतमाळ येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जबरी वसुली सुरू असल्याचा आरोप न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी केला. ते येथील विश्रामगृहात शुक्रवारी (ता. 28) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आयोजकांनी वर्गणी व खर्चाचा हिशोब जनतेसमोर सादर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी विविध अनावश्‍यक बाबींवर आर्थिक उधळपट्टी होत आहे. महाराष्ट्र शासन अ.भा.मराठी साहित्य संमेलनासाठी 50 लाखांचे अनुदान देते. मग जनतेकडून वसुली करण्याचे औचित्य काय? शासनाने दिलेल्या निधीपेक्षा जास्त खर्च कार्यक्रमासाठी होत असेल तर ज्या संस्थांच्या माध्यमातून हा खर्च होत आहे त्या संस्थांनी हा खर्च करणे अभिप्रेत आहे. त्यामुळे अतिरिक्त खर्च जनतेवर लादण्याचा प्रकार चुकीचा आहे, असे पवार यावेळी म्हणाले.
या संमेलनासाठीच्या वसुलीतून विविध संस्था, कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये, जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी व एवढेच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांनाही सोडलेले नाही. विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दहा रुपये या कार्यक्रमासाठी घेण्यात येत आहेत. त्यासाठी नियमाने धर्मादाय आयुक्तांची परवानगीही घेतलेली नाही. या वर्गणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही सूचना देण्यात आल्या नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी या सर्व
प्रकारात लक्ष देऊन चौकशी करावी, अशी मागणीही देवानंद पवार यांनी यावेळी केली.
 
Web Title: devanand pawar news