Video : माजी मुख्यमंत्री फडणवीस उतरले रस्त्यावर, कशासाठी? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 डिसेंबर 2019

सीएएच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. त्यांच्या मागे हजारोंच्या संख्येने नागरिक फलक व झेंडे घेऊन जात होते. या विधेयकाबाबत असलेल्या गैरसमजाचे निराकरण करण्यासाठी लोकाधिकार मंचाने रविवारी भव्य रॅलीचे आयोजन केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी झाणी राणीच्या पुतळ्याला मार्ल्यापण करून अभिवादन केले. 

नागपूर : भारत सरकारने मंजूर केलेले नागरिकता संशोधन विधेयकाचे (सीएए) समर्थन करण्यासाठी आणि या विधेयकाबाबत असलेल्या गैरसमजाचे निराकरण करण्यासाठी लोकाधिकार मंचाने रविवारी (ता. 22) भव्य रॅलीचे आयोजित केले होते. रॅलीत सहभागी होण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर संदीप जोशी, चंद्रशेखर बावनकुळे आदींचा सहभाग होता. 

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून ईशान्य भारतात सुरू झालेल्या आंदोलनाची धग देशभर पोहोचली आहे. "दिल्ली ते गल्ली' या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. नागपुरातही यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. शनिवारी अमरावतीती बडनेरा येथे रेल्वेरोको आंदोलनही करण्यात आले. कालच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशात नागरिकत्व सुधारणा विधेयकाला कडाडून विरोध झाला होता. यामुळे सभागृहात चांगलाच गदारोळ झाला होता. 

ठळक बातमी - शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार

 

 

Image may contain: one or more people, crowd, basketball court and outdoor

सत्ताधारी हे सीएएला विरोध करीत होते तर विरोधक हे देशासाठी योग्य असल्याचे सांगत होते. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद होत होता. एकंदरीत नागरिकतव सुधारणा विधेयकाला होत असलेला विरोध बघून रविवारी नागपुरात मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा लोकाधिकार मंचाच्या वतीने सीएएच्या समर्थनार्थ व गैरसमज दूर करण्यसाठी काढण्यात आला. यशवंत स्टेडियमपासून प्रारंभ झालेल्या रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. नागरिक विविध झेंडे व फलक घेऊन सहभागी झाले होते. तसेच ते घोषणा देत पुढे जात होते. 

विविध संघटनांचा सहभाग

रॅली झाशी राणी चौकात पोहोचल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झाशीच्या पुतळ्याला मार्ल्यापण केले. यावेळी नागरिक घोषणा देत होते. तसेच व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला महापौर संदीप जोशी यांनी माल्यार्पण केले. रॅलीत भारतीय जनता पक्ष, विश्‍व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनांचा सहभाग होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis on the streets in support of CAA in Nagpur