Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली भेटीमुळे पोलिसांना बळ मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis visit to Gadchiroli after Naxalite attack strengthen police

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली भेटीमुळे पोलिसांना बळ मिळणार

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच गडचिरोलीतल्या जिल्हातल्या दक्षिणेकडील दामरंचा आणि छत्तीसगढच्या सिमेवर लागून असलेल्या ग्यारापत्ती या नक्षलग्रस्त भागाला भेट दिली.

१९८२ मध्ये कमलापूर आणि दामरंचा इथून नक्षलवाद्यांच्या सशस्त्र चळवळीला सुरु झाली होती. दामरंचा आणि ग्यारापत्ती या परिसरात नक्षलवाद्यांचा कारवाया मोठ्या प्रमाणात चालतात. ग्यारापत्ती या भागातचं मावोवादी झोनल कमांडर मिलिंद तेलतुंबडे पोलिस

चकमकीत मारला गेला होता. ग्यारापत्ती आणि दामरंचा या दोन्ही अतिसंवेदनशील गावाला भेट देणारे देवेंद्र फडणवीस पहिले उपमुख्यमंत्री ठरलेत.या भेटीमुळे नक्षलवाद्यासोबत निकराची लढाई लढणाऱ्या जवानांचे मनोबल वाढवण्यात मोठी मदत होईल असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गडचिरोलीमध्ये नक्षलवादी चकमक झाली,पोलिस शहिद होतात तेव्हा गडचिरोलीमध्ये राज्याचे सर्वच नेते भेट द्यायला येतात. मात्र त्यावेळी सर्वजण दुखात, दडपणात, भितीच्या सावटात असतात.

मात्र शांततेच्या काळात या भागाला भेट देवून पोलिस जवानांच्या पाठीवर कौतूकाचा हात ठेवणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे हे जास्त महत्वाचे असते.त्यातून पुढच्या लढाईसाठी आपले पोलिस जवान सज्ज होतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची आताची भेट त्यादृष्टीने महत्वाची आहे असे निवृत्त पोलिस महासंचालक प्रविण दिक्षीत यांनी सकाळशी बोलतांना सांगीतले.

जनतेसोबत संवाद

मुख्यमंत्री पदावर आल्यापासून देवेंद्र फडणवीस यांचे गडचिरोलीवर कायम लक्ष राहीले आहे.मुख्यमंत्री असताना फडणवीस यानी एटापल्ली तालुक्यातील बुरगी नावाच्या दुर्गम गावाला भेट दिली.गडचिरोली दोनदा मुक्काम करणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पहिले मुख्य़मंत्री आहेत.

यावेळी फडणवीस यांनी एक दिवसापुर्वी जिथे पोलिस-नक्षलवाद्यांची चकमक झाली त्या ठिकाणावरुन जवळ असलेला अहेरि तालुक्यातील दामरंचा इथे भेट दिली. तिथून ग्यारापत्तीला गेले हे महाराष्ट्रातील शेवटचे गाव आहे. छत्तीसगडची सिमा इथून सुरु होते.हे दोन्ही भाग विकासापासून कोसो दूर आहे.

देवेंंद्र फडणवीस यांनी पोलिस जवान आणि सामान्य नागरिक, महत्वाचे म्हणजे महिलांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडचणी आणि शासकीय योजनांबद्दल माहिती विचारली. ग्यारापत्ती भागात रस्तांचे जाळे चांगले असूनही कोरोना काळापासून एसटी सेवा बंद आहे. हे लक्षात आणून दिल्यावर उपमुख्यमत्र्यांनी तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

या संपुर्ण दौऱ्यात फडणवीस यांनी सी-६० जवानांचा ड्रेस घालून होते.मी तूमच्यातला आहे. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पोलिस जवान आपला जिव धोक्यात टाकतात. त्या जवानांसोबत मी आहे हा संदेश फडणवीस यांनी भेटीच्या माध्यमातून दिला. ग़डचिरोली अत्यंत दुर्गम भाग आहे.

नक्षलवाद्यासोबत लढतांना जवानांना अनेक समस्या असतात. त्यात आधुनिक शस्त्रास्त्रे, संसाधनाची अडचणी असू शकतात. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभागासोबत अर्थ विभागही आहे.

त्यामुळे जवानांना भेडसावणाऱ्या अडचणी ते तातडीने दूर करु शकतात. या शिवाय ते केंद्र आणि इतर राज्याशी बोलून चांगले उत्तम समन्वयही साधू शकतात. यापुर्वी आर आर पाटील, एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीला कायम भेटी दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस देखील कायम गडचिरोलीला भेट देतात.असे प्रविण दिक्षीत सांगतात.