अंबाबारवा अभयारण्यात भाविकांची गर्दी

पंजाबराव ठाकरे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

संग्रामपूर व जळगाव जा. चे मध्यभागी आदिवासी ग्राम शिवणी परिसरात जटा शंकर हे ठिकाण प्रसिद्ध झाले आहे. इ. स. 1600 चे पूर्वीची या ठिकाणचे टेकडीमध्ये महादेवाच्या पिंडीची स्थापना असल्याचे जाणकार सांगतात.

संग्रामपूर - सातपुडा पर्वताच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात वसलेले अती प्राचीन शंकराचे शक्ती स्थान भाविकांचे श्रद्धा स्थान बनले आहे. श्रावण महिन्यात अंबाबारवा अभयारण्यातील महागिरी महादेव आणि जटाशंकर दर सोमवारी गर्दीने गजबजलेले असतात. या ठिकाणी भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात येत आहे. 20 ऑगस्टला जटाशंकर येथे भव्यदिव्य महाप्रसादाचे आयोजन असल्याची माहिती वारी हनुमान पिठा चे कृष्णानंद भारती महाराज यांनी दिली.

संग्रामपूर व जळगाव जा. चे मध्यभागी आदिवासी ग्राम शिवणी परिसरात जटा शंकर हे ठिकाण प्रसिद्ध झाले आहे. इ. स. 1600 चे पूर्वीची या ठिकाणचे टेकडीमध्ये महादेवाच्या पिंडीची स्थापना असल्याचे जाणकार सांगतात. महाभारत कालीन हा भाग दंडाकारन्य म्हणून ओळखला जात होता. ज्या टेकडीचे मध्यभागी महादेवाची पिंड आहे त्या टेकडी चे वरचे टोकावरून जवळपास दोनशे फुटावरून नदीचा प्रवाह धबधब्यात रूपांतरित होऊन खाली कोसळत असतो व पुढे पुन्हा नदीचा प्रवाह तयार होतो.

जामोद टूनकी रस्त्यावरील करमोडा गावावरून उत्तरेस दयालनगर वरून 3 किमी अंतरावर हे ठिकाण पर्यटकांनाही आकर्षित करणारे आहे. श्रावणात सोमवारी या ठिकाणी दूर वरून नागपूर पासून भाविकांसह पर्यटक हजेरी लावतात. 

असेच दुसरे महादेवाचे ठिकाण याच पर्वतरांगामध्ये महागिरी महादेव म्हणून प्रचलित आहे. सोनाळा गावापासून उत्तरेस पर्वतामध्ये आत 15 किमी अंतरावर एका अती उंच टेकडीवर हे स्थान आहे. हे ठिकाणही अती प्राचीन आहे. सोनाळा येथील संत सोनाजी महाराज मुळे हे ठिकाण समोर आले आहे. जमिनीपासून सात हजार फूट उंच टेकडी वर अती दुर्गम ठिकाणी आड रस्त्याच्या मार्गात टेकडीच्या कपारीत महादेवाची स्थापना आहे.

त्या टेकडीवर आणि टेकडीच्या पायथ्याशी पाणी नाही. परंतु टेकडीच्या कपारीत बाराही महिने पाण्याचा संचय दिसून येतो. या ठिकाणी दूरवरून येणाऱ्यांची गर्दी दरवर्षी वाढतच आहे. 

महागिरी महादेव, जटाशंकर, उबरदेव या तीन ठिकाणांसह कुऱ्हा जवळ पहाडात महादेवाचे पुरातन ठिकाण आहेत. या ठिकाणाची जास्तीत जास्त नागरिकांना ओळख असावी आणि जागृती निर्माण करण्याचे उद्देशाने श्रावण महिन्यात चार ठिकाणी चार वेगवेगळ्या सोमवारी महाप्रसाद म्हणून भंडारे सुरू केले आहेत. यात पहिला सोमवार कुऱ्हा खिरपुरी, दुसरा सोमवार जटा शंकर बाफले दाल, तिसरा सोमवार उबरदेव आणि चवथा महागिरी महादेव असे नियोजन करण्यात येते. याचा लाभ पंच क्रोशीतील भाविकांसह दूरवरून येणारे भाविक ही घेत आहेत. - श्री कृष्णानंद भारती महाराज वारी हनुमान सस्थान

Web Title: Devotees Crowd At Ambabarava Sanctuary In Sangrampur