तीर्थक्षेत्र लक्षेश्वर नगरीत कावड यात्रा महोत्सवाने दुमदुमली लाखपुरी नगरी

devotees crowd at pilgrim lksheshwar nagari lakhpuri akola
devotees crowd at pilgrim lksheshwar nagari lakhpuri akola

अकोला (लाखपुरी) : विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान लाखपूरी ता. मूर्तिजापुर जि. अकोला येथे दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारी कावड यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मूर्तिजापूर, दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील जवळपास 32 मोठे मंडळ या यात्रेत सहभागी झाले होते. सार्वजनिक कावड उत्सव समिती तर्फे दहा हजार शिवभक्तांसाठी महाप्रसाद तयार करण्यात आला होता.

ग्रामपंचायत तर्फे नदीपर्यंत रस्ता दुरुस्ती व लाईटची व्यवस्था करण्यात आली. तहसील कार्यालय मुर्तीजापुरतर्फे नदीवर सर्च लाईट बसवले. आ. हरीश पिंपळे यांनी ॲम्बुलन्स, आरोग्य पथक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. श्री लक्षेश्वर संस्थानतर्फे मंदिरावर विद्युत रोषणाई, स्टेज, तैराकी पथक, वाहनतळ इत्यादी व्यवस्था केली. निलेश ठाकरे, सागर इंगळे व त्यांच्या चमूने शिवभक्तांसाठी गीत गायनाचा संगीतमय कार्यक्रम सादर केला कावड यात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमाला ज्येष्ठ सहकारी श्री रामभाऊ साळुंके गुरुजी अध्यक्ष म्हणून लाभले.

यावेळी प्रमुख अतिथी आ. हरीश पिंपळे, जि. प. अध्यक्ष संध्याताई वाघोडे, माजी अध्यक्ष बालमुकुंदजी भिरड, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, तहसीलदार राहुल तायडे, जि. प. सदस्य सम्राट डोंगरदिवे, नायब तहसीलदार वैभव फरताडे, सा. बां. कार्यकारी अभियंता दिलीप साळुंके, उप अभियंता उमेश वानखडे, शिवसेना तालुकाप्रमुख अप्पू तिडके, गुलाबभैया दुबे, रवि राठी, प. स. सदस्य जितेंद्रसिंह साळुंके, अॅड. चंद्रजीत देशमुख, त्रिलोक महाराज, गजानन बोंडे कृष्णकुमार भट्टड, अविन अग्रवाल, ठाकूरदास अरोरा, जि. प. सदस्य सुनील डिके, सरपंच दिनेश चव्हाण, बबलू ढोक, कमलाकर गावंडे, राजू सदार, किसनराव साळुंके, जितेंद्र नेभनाणी, दिवाकर गावंडे, निजाम इंजिनियर, बाळासाहेब इसाळकर राम कोरडे, सुरेंद्र वरोकार, इब्राहिम घाणीवाले, संदीप जळमकर, संतोष भांडे, पिंटू डांगे, केदार खरे इत्यादी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन श्री. लक्षेश्वर संस्थानचे अध्यक्ष राजुभाऊ दहापूते यांनी केले.
 
सत्कार समांरभ
कावड यात्रेनिमित्त लाखपूरीच्या प्रत्येक कार्यक्रमाला सहकार्य करणारे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय रामभाऊ आकारामजी साळुंके गुरुजी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त व नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल व कबड्डीपटू स्व.धनंजय देशमुख यांच्या परिवाराला वीस हजार रुपयांची मदत करणारे जि. प. सदस्य सम्राट डोंगरदिवे या सर्वांचा सार्वजनिक उत्सव समितीतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.

रात्री बारा वाजता महाआरती करण्यात आली. यावेळी मुख्य यजमान मंगेश काळे नगरसेवक मनपा अकोला हे उपस्थित होते. आरतीनंतर कावडचे प्रस्थान झाले. शेवटची कावड सकाळी चार वाजता गेली. कावड यात्रा व्यवस्थित पार पाडण्याकरिता लक्षेश्वर संस्थानचे शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

शिवभक्तांनी मानले आभार
कावळ यात्रेदरम्यान रविवारी दुपारी तीन वाजता पासून रात्री चार वाजेपर्यंत मुर्तीजापुर ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी स्वतः हजर राहून वाहतूक व्यवस्था सुरळीत लावली. त्याचप्रमाणे नदीपासून ते मुर्तिजापूरपर्यंत अनेक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला. त्यांच्या नियोजनामुळे कावड यात्रा शिस्तबद्ध व शांततेत संपन्न झाली. त्यांचं कार्य पाहून सर्व शिवभक्त कावड मंडळांनी ठाणेदार नितीन पाटील व त्यांच्या सर्व टिमचे तोंड भरून कौतुक केले त्यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com