सासुसुनेच्या हातच्या चिकनची चव चाखली का? कष्ट करून सांभाळतात शेती आणि ढाबा

संदीप रायपूरे
बुधवार, 11 मार्च 2020

तेरा एकर शेतीत त्या धान, सोयाबीन, कापूस, हरभरा, गहू, कांदे, मिरची या पिकांचे उत्पादन घेतात. सकाळी सहा वाजतापासून शेतातील काम करायच. यानंतर दोन मुलींच्या शाळेची तयारी अनं मग ढाब्यात स्वयंपाक बनविण्यापासून तर सारच नियोजन करायच. रात्री उशिरापर्यत स्वयंपाकाचं काम केल्यानंतर दुस-या दिवशी पुन्हा पहाटे उठून कामाला लागायच. हा त्यांचा दिनक्रम आहे. त्यांच्या ढाब्यातील गावराणी कोबंडयाचं चिकन अतिशय लोकप्रिय आहे.

गोंडपिपरी : सकाळी सहा वाजता उठायच अनं थेट शेत गाठायचं तिथली काम आटोपून मग शेतातील ढाब्यात कामाला लागायचं. तेरा एकर शेतीच नियोजन अनं पुर्णवेळ ढाब्याची जबाबदारी सांभाळायची. अशावेळी अडलेल्यांना विनामुल्य जेवण देत सामाजिक दायित्व जोपासायच. धानापूरात अरुणाताईची ही वाटचाल प्रेरणादायी आहे.
गोंडपिपरी तालुक्‍यातील धानापूर येथील दिलीप साळवे यांची अहेरी चंद्रपूर मुख्य मार्गावर तेरा एकर शेती आहे. अनेक वर्ष शेती सांभाळतांना त्यांनी शेतातच ढाबा सुरू केला. सुरुवातीला त्यांनी ही सारी जबाबदारी पेलली. पण काही कारणास्तव हा सारा भार त्यांची पत्नी अरूणा साळवे यांच्यावर आला. तेरा एकर शेतीत त्या धान, सोयाबीन, कापूस, हरभरा, गहू, कांदे, मिरची या पिकांचे उत्पादन घेतात. सकाळी सहा वाजतापासून शेतातील काम करायच. यानंतर दोन मुलींच्या शाळेची तयारी अनं मग ढाब्यात स्वयंपाक बनविण्यापासून तर सारच नियोजन करायच. रात्री उशिरापर्यत स्वयंपाकाचं काम केल्यानंतर दुस-या दिवशी पुन्हा पहाटे उठून कामाला लागायच. हा त्यांचा दिनक्रम आहे. त्यांच्या ढाब्यातील गावराणी कोबंडयाचं चिकन अतिशय लोकप्रिय आहे. बल्लारपूर आल्लापल्लीपासून लोक या चिकनचा आस्वाद घेण्यासाठी या ढाब्यात येतात. मुख्य मार्गावरील अनेक अडलेल्या प्रवाशांना त्या विनामुल्य जेवण देतात.प्रत्येक दिवशी असे अनेक प्रसंग येतात. पण आम्ही कधी पैशाचा हिशोब करित नाही माणुसकीच्या भावनेतून आम्ही अशा अडलेल्यांना, भुकेल्यांना विनामुल्य जेवण देत असल्याचे ते सांगतात. गेल्या दहा वर्षापासून व्यवसायातून सामाजिक दायित्व जोपासण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे.
सामाजिक कार्य करण्यासाठी मनाची तयारी असणे आवश्‍यक असते. यातूनच प्रत्यक्षात ती साकारली जात असते. अरूणा साळवे यांनी याचाच प्रत्यय दिला आहे. महिला असूनही तेरा एकर शेतीच्या नियोजनासह प्रचंड चालणा-या ढाब्याचे व्यवस्थापन करणा-या अरूणाताईंची ही वाटचाल अनेकांना प्रेरणेची शिदोरी ठरली आहे.
सासुचीही मदत
अरूणा यांच्या सासू विठाबाई यांची त्यांना मोठी मदत मिळते. दुस-या सासूबाई शोभा वडस्कर या अंगणवाडी सेविका आहेत. पण त्याही आपली नोकरी पार पाडून पुर्णवेळ अरूणाच्या मदतीसाठी तत्पर असतात. अरूणा यांचे पती दिलीप साळवे, सासरे हश्‍चिंद्र साळवे, दिर विपील घाटे हे सार कुटुंब त्यांच्या मदतीला पुर्णवेळ असतात.

आमच्या संवेदना जिवंत
आम्ही शेतकरी असल्यामुळे आमच्या संवेदना जिवंत आहेत. ढाब्याच्या माध्यमातून आम्ही अनेक अडलेल्यांना विनामुल्य जेवण देतो. प्रत्येक दिवशी असे अनेक प्रसंग येतात
अरूणा साळवे,धानापूर  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhaba successfully run by women