धवड दाम्पत्याची हायकोर्टात धाव

file photo
file photo

नागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणात आरोपी असलेले अध्यक्ष माजी आमदार अशोक शंकर धवड (65) व त्यांच्या पत्नी किरण (59) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जांवर 16 जुलै रोजी न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.
एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने काही दिवसांपूर्वी धवड दाम्पत्यासह इतर आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यामुळे धवड दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बॅंकेत 38 कोटी 75 लाख 20 हजार 641 रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी 15 मे 2019 रोजी श्रीकांत सुपे (57) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम 406, 409, 420, 120-ब, 465, 467, 468, 471, 477-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. 2014-15 मध्ये बॅंकेतून 4 कोटी 3 लाख रुपयांची उचल करण्यात आली व बनावट कागदपत्रांच्या आधारे ती रक्कम बॅंकेला परत केल्याचे दाखवण्यात आले होते. अशा विविध प्रकारे बॅंकेत घोटाळा करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com