धानाचे शेत झाले तलाव

रूपेश वणवे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

शिवनी (भोंडकी) - रामटेक तालुक्‍यातील भंडारबोडी येथील शेतकरी लक्ष्मण सखाराम शिवरकर यांच्यावर यंदाही नापिकीची वेळ येण्याची शक्‍यता आहे. नजीकच्या सिंचन तलावाच्या पाण्याचा ओव्हरफ्लो झाल्याने शेतात पाणी घुसले. यामुळे त्यांचे शेतही तलावात रूपांतरित झाले आहे. 

शिवनी (भोंडकी) - रामटेक तालुक्‍यातील भंडारबोडी येथील शेतकरी लक्ष्मण सखाराम शिवरकर यांच्यावर यंदाही नापिकीची वेळ येण्याची शक्‍यता आहे. नजीकच्या सिंचन तलावाच्या पाण्याचा ओव्हरफ्लो झाल्याने शेतात पाणी घुसले. यामुळे त्यांचे शेतही तलावात रूपांतरित झाले आहे. 

याबाबत त्यांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याचे निराकरण होत नसल्याने त्रस्त शेतकऱ्याने कुटुंबासह जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. भंडारबोडी या गावी लक्ष्मण सखाराम शिवरकर यांची वडिलोपार्जित साडेचार एकर शेती असून याच शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शिवरकर यांच्या शेताला लागून जिल्हा परिषद सिंचन विभागाचे तलाव आहे.सदर तलाव पावसाळ्यात तुडुंब भरतो. तलाव झाल्यापासून ओव्हरफ्लोमुळे पाणी शेतात शिरून उत्पादन होत नाही. त्यामुळे दरवर्षी त्याच्या शेताला तलावाचे स्वरूप येते. परिणामी शेतातील संपूर्ण धानाचे पीक खराब होऊन लाखोंचे नुकसान शिवरकर यांना होत असल्याचे वास्तव आहे.

दरवर्षी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे पीक होत नाही. कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी चहाटपरी टाकली आहे. शेतकऱ्यावर अशी परिस्थिती आली असताना मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
- लक्ष्मण शिवरकर, शेतकरी

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन 
सन २०११ पासून संबधित प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनदेखील समस्येकडे लक्ष देण्यात प्रशासन तयार नाही. अशात उपासमारीची झळ सोसणाऱ्या शिवरकर परिवाराने येत्या ८ दिवसात समस्येचे निराकरण न केल्यास सहकुटुंब आत्महत्या करण्याचा इशारा रामटेकच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे. पिकाची नुकसानभरपाई द्यावी, तलावाची व्यवस्था करावी किंवा कृषी जमीन विभागाने संपादित करून त्याचा मोबदला द्यावा, ही शेतकऱ्याची मागणी आहे.

Web Title: Dhan Rain lake Overfull Agriculture Loss