धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर; अमरावतीत आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन केल्यानंतर धनगर समाज बांधवानी दुपारी 12 वाजता अमरावती-नागपूर हा महामार्ग रोखून धरला. धनगर समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात स्थानिक गौरी इन हॉटेल समोर आंदोलन करण्यात आले.

अमरावती : धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी धनगर समाज बांधवानी आज सोमवारी राज्य महामार्ग क्रमांक सहा रोखून धरला. आंदोलनकर्त्यांनी येळकूट येळकूट जय मल्हारच्या घोषणा देऊन महामार्ग दणाणून सोडला होता. 

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन केल्यानंतर धनगर समाज बांधवानी दुपारी 12 वाजता अमरावती-नागपूर हा महामार्ग रोखून धरला. धनगर समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात स्थानिक गौरी इन हॉटेल समोर आंदोलन करण्यात आले. संघटनेचे संतोष महात्मे यांचेसह जानराव कोकरे, डॉ. मेघश्याम करडे यांचेह शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या करणाऱ्या परमेश्वर घोगडे, योगेश पराडे या दोन तरुणांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. 

Amravati

आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास 30 मिनिटे ठप्प झाली होती. महामार्गावरील दोन्ही दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. धनगर समाजाची सरकारने दिशाभूल केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

Amravati

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Dhangar community on the road for reservation Amravati Agitation