धीना धीन धा..!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

धीना धीन धा..!
नागपूर : अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांचा उल्लेख झाला की "राम-लखन'ची जोडी चाहत्यांच्या डोळ्यापुढे येते. कित्येक वर्षे पडद्यावर दिसणारी ही जोडी खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने नागपूरकरांनी प्रत्यक्ष बघितली. या दोघांनी नागपुरात प्रथमच एकत्रित प्रथमच हजेरी लावल्याने खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‌घाटन खऱ्या अर्थाने "झक्कास' झाले.

धीना धीन धा..!
नागपूर : अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांचा उल्लेख झाला की "राम-लखन'ची जोडी चाहत्यांच्या डोळ्यापुढे येते. कित्येक वर्षे पडद्यावर दिसणारी ही जोडी खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने नागपूरकरांनी प्रत्यक्ष बघितली. या दोघांनी नागपुरात प्रथमच एकत्रित प्रथमच हजेरी लावल्याने खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‌घाटन खऱ्या अर्थाने "झक्कास' झाले.
जवळपास दीड तास या दोघांचा सहवास चाहत्यांवर असा काही प्रभाव करून गेला की लोक घरी जातानाही त्यांची गाणी गातच बाहेर पडले. केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव होत आहे. उद्‌घाटन सोहळ्याला अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्यासह नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, प्रा. अनिल सोले आदींची उपस्थिती होती. जॅकी आणि अनिल यांची एन्ट्री होण्यापूर्वीच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दोन्ही "भिडू' रंगमंचावर येताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. दोघेही आले तेव्हा "मेरा कर्मा तू' हे गीत सुरू होते. जग्गू दादाने अनिल कपूरचा हात पकडून त्याला उभे राहायला सांगितले आणि गायकांच्या बाजूला जाऊन तेही गाणं गुणगुणायला लागले. मुख्य म्हणजे दोघांनीही वादकांचे मनभरून कौतुक केले. बाळ कुळकर्णी यांनी संचालन केले.
ऍडव्हान्स बुकिंग
नितीन गडकरी म्हणाले, "मी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष असताना एकदा जॅकी श्रॉफ मला भेटले आणि त्यांनी दक्षिण मुंबईला मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेला जोडण्याची मागणी केली. मी त्यांना सांगितलं की आमची सत्ता नाही तरी मागणी का करताय. तर जॅकी श्रॉफ म्हणाले, सत्ता येणार आहे म्हणून आपण ऍडव्हान्स बुकिंग करतोय.
पडदे पे राम, बाहर लखन!
"आप में से बडा कौन है? असा प्रश्न आरजेने विचारल्यावर जग्गू दादाने
"मै सिर्फ पडदे पे मै राम हूँ. पडदे के बाहार ये राम और मै लखन हूँ', असे उत्तर दिले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. अनिल मेरे से बडा है, पर दिखता एकदम बच्चा है. और इसकी भाषा से भी ये पढा लिखा लगता है' अशी कोटी करून जॅकीने चाहत्यांमध्ये हास्य फुलवले.
वन टू का फोर!
जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांनी गायकांसोबत गाणीही गायली. अनिलने "कह दो की तुम हो मेरी वरना', जॅकीने "सुन बेलिया शुक्रिया मेहरबानी' ही गाणी गाऊन चाहत्यांना खुश केले. याशिवाय "वन टू का फोर' या गाण्यावर अनिल कपूरने ठेका धरल्यामुळे गर्दीमध्ये प्रचंड जल्लोष झाला. अनिल कपूरसोबत चाहतेही या गाण्यावर नाचू लागले.

Web Title: Dhina Dhana Dha..!