esakal | मधुमेही रुग्णांनो, सावधान..! काळजी घ्या!!
sakal

बोलून बातमी शोधा

index hai

मधुमेह रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे साथीच्या रोगाशी लढण्याची  त्यांची क्षमता कमी झालेली असते. रुग्णांच्या रक्तातील अतिशर्करा हे विषाणूच्या  संक्रमणासाठी अनुकूल असते. रुग्णांनी गर्दीत  जाणे टाळले पाहिजे.

मधुमेही रुग्णांनो, सावधान..! काळजी घ्या!!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : मानवाचे जगणे असह्य करणारा कोरोना विषाणू रुग्णांमध्ये वेगवेगळे रूप  घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांसमोर येत आहे. विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांचे या विषाणूने  अनेक जीव घेतले आहेत. मधुमेही  रुग्णांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

भारताला डायबिटीसची जागतिक राजधानी म्हटले जाते. मधुमेही  रुग्णांनी आपली विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत मधुमेहतज्ज्ञ डॉ.  आशीष उजवणे यांनी "सकाळ संवाद'मध्ये बोलताना व्यक्त केले.

मधुमेहाच्या रुग्णांना कोरोना विषाणूची लागण होण्याची संभावना इतर रुग्णांच्या मात्रेमध्ये  सारखी असली, तरी विषाणूमुळे होणाऱ्या दुष्परिणामाची शक्‍यता जास्त असण्याची कारणेही  आहेत.

मधुमेह रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे साथीच्या रोगाशी लढण्याची  त्यांची क्षमता कमी झालेली असते. रुग्णांच्या रक्तातील अतिशर्करा हे विषाणूच्या  संक्रमणासाठी अनुकूल असते. या आजारामुळे बरेचसे मधुमेही रुग्ण मानसिक तणावाखाली  आहेत.

रुग्णांची रक्तातील साखरेची तपासणी जर नियंत्रित असेल, तर तोंडावाटे घेत असलेली  औषधे किंवा इन्शुलिन यांच्यात कोणताही बदल करण्याची गरज नाही. रुग्णांनी गर्दीत  जाणे टाळावे, वारंवार हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, अशाप्रकारे काळजी घेतली  पाहिजे.

हेही वाचा : मोठी बातमी : निरोगी व्यक्‍तींवर होणार कोरोना प्रतिबंधक लशीची चाचणी, नागपुरातील या रुग्णालयात सुविधा...

रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण घरी वारंवार ग्लुकोमीटरवर चेक करावे.  डायबेटिक डायटचे पालन करावे. साखरेचे प्रमाण नियंत्रित असल्यास विशेष आहारामध्ये  बदलांची गरज नाही.

गर्दीच्या ठिकाणी मधुमेही रुग्णांनी जाणे टाळलेच पाहिजे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन संक्रमण होऊ शकते. हाताची स्वच्छता ठेवावी,  मास्कचा वापर करावा, नियमित व्यायाम करावा, पौष्टिक व संतुलित आहार घ्यावा.

डॉ. आशीष उजवणे, मधुमेहतज्ज्ञ, यवतमाळ.

 

loading image