गडचांदूर परिसरात अतिसाराची लागण; रुग्णालये हाऊसफुल

file photo
file photo

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : दूषित पाण्याने गडचांदूर परिसरात अतिसाराची लागण झाली असून अनेक रुग्ण ग्रामीण रुग्णालयात भरती आहेत. रुग्णालयात बेडची संख्या कमी आणि रुग्ण जास्त आहे. त्यामुळे एकाच खाटेवर दोन रुग्णांना उपचार घ्यावे लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलून गेले आहे. बदलेल्या वातावरणामुळे तापाची साथ गडचांदूर परिसरात पसरली आहे. त्यात दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात सध्या 45 हुन अधिक रुग्ण अतिसाराचे दाखल आहेत. बाह्यरुग्ण विभागात दररोज 400 हून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी खाटा नसल्याने प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना परतावे लागत आहे. गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात बेडची संख्याही कमी आहे. एकाच बेडवर दोन रुग्णांना उपचार घ्यावा लागत आहे. त्यात डॉक्‍टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.
उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षा
कोरपना, जिवती आणि राजुरा तालुक्‍यांतील गडचांदूर हे शहर मध्यवर्ती आहे. कोरपना, जिवती तालुक्‍यातील रुग्ण गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात येतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com