सर्वांत उंच, डौलदार पक्षी बघितला का?

मुनेश्‍वर कुकडे 
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

- पर्यटकांना खुणावतोय सारस 
- धानशेती, तलावांमुळे मिळेतय सरंक्षण 
- गतवर्षी 48 तर यावर्षी 54 सारस पक्षी आढळले 

गोंदिया : धानाचे कोठार म्हणून प्रसिद्धीला आलेल्या गोंदिया जिल्ह्यात नवगावेबांध, नागझिरा या अभयारण्यांनी पर्यटकांना व्याघ्र आणि वन्यप्राण्यांची दर्शनाची संधी दिली. मात्र, पर्यटकांना खुणावतोय येथील सारस. दुर्मिळ अशी सारस प्रजाती जिल्ह्यात पहायला मिळत आहे.

मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्राच्या सिमेवर या पक्ष्याचे सहज दर्शन होत असल्याने पर्यटकांनी ओढा याकडे वाढला आहे. यामुळे परसवाडा, झिलमिली, कामठी आणि पांजरा येथे पर्यटकांनी गर्दी होत आहे. यावर्षी 42 सारस पक्षी आढळून आले आहेत, हे विशेष. 

Image may contain: sky, bird, outdoor, nature and water
तलाव परिसरात मुक्त संचार करताना सारस पक्षी. 

महाराष्ट्राच्या सिमेलगत असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात गतवर्षी 48 तर यावर्षी 54 सारस पक्षी आढळले. बाघ व वैनगंगा नदी महाराष्ट्रातील गोंदिया तसेच मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यांना विभाजित करते. भौगोलिक दृष्टिकोनातून जैवविविधतेत या दोन्ही जिल्ह्यात समानता आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात सारस पक्ष्यांचे वास्तव्य दिसून येते. 

Image may contain: bird, outdoor and nature

जगात उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये सर्वांत उंच, डौलदार पक्षी म्हणून "सारस'ची ओळख आहे. या पक्ष्याचा धान शेती, तलाव व नदीकाठावर अधिवास आहे. शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणूनही तो ओळखला जातो. सारस पक्ष्याचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी पहिल्यांदा 2015 मध्ये येथे "सारस फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले होते.

या फेस्टिव्हलमध्ये देशभरातील वन्यजीव व पक्षीप्रेमी सहभागी झाले होते. त्यानंतर दरवर्षी सारस मित्र संमेलनाचे आयोजन गोंदिया व बालाघाट हे जिल्हे मिळून करतात. या संमेलनात सारस मित्र व शेतकऱ्यांना सन्मानित केले जाते. 

सरकारचे दुर्लक्ष 
सारसाचे संवर्धन करताना सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वन्यप्रेमींकडून करण्यात येत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने त्याचा फटका सारसांना बसत आहे. सरकारने सारस संवर्धनासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून करण्यात येत आहे. 


सावन बहेकार

संरक्षणासाठी प्रयत्न होणे गरजेचे 
गोंदिया जिल्ह्याबरोबर भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात सारस पक्षी गणना करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात सारस पक्षी गोंदिया व सीमावर्ती भागात पाहावयास मिळतो. तत्कालीन सारस गणनेनुसार, महाराष्ट्रात 42 सारस पक्षी आढळले. हा चिंतेचा विषय आहे. सारस संरक्षणासाठी स्वयंसेवी संस्था, प्रशासकीय स्तरावरदेखील प्रयत्न होणे गरजेचे आहे. 
- सावन बहेकार, अध्यक्ष, सेवा संस्था, गोंदिया. 

Image may contain: bird, sky, outdoor and nature

2018 मधील सारस पक्षी गणना (जिल्ह्यामध्ये) 
जिल्हा        पक्षी 
गोंदिया        38 
बालाघाट      48 
भंडारा          3 
चंद्रपूर          1 

2019 मधील सारस पक्षी गणना 
जिल्हा        पक्षी 
गोंदिया        42 
बालाघाट      54 
भंडारा          3 
चंद्रपूर         1 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Did you see the tallest bird?