क्रांतिदिनी येथे झाले अनोखे आंदोलन; निघाली शासनाची प्रेतयात्रा. पण काय होते कारण..एकदा वाचाच 

Different type of protest done by Prahar in Amravati district
Different type of protest done by Prahar in Amravati district

दर्यापूर (जि- अमरावती) : सातेगाव ते बाग रस्ता पुलाचे बांधकाम मंजूर झाल्यानंतरही अद्यापही त्याचे बांधकाम पूर्ण न झाल्याने तसेच लेंडी नाल्याच्या पुलाकरिता प्रहारच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. याच लेंडी नाल्याकरिता मागील वर्षी गावक-यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर यांच्या नेतृत्वात अर्धनग्न आंदोलन केले होते.  या वर्षी मात्र अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. 

तालुक्यातील येवदा, सातेगाव, बाग रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. मात्र तरीदेखील बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही. शिवाय लेंडी नाल्यावरील पुलाचे बांधकामसुद्धा न झाल्याने रविवारी (ता. नऊ) क्रांतिदिनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रेतयात्रा काढून आंदोलन करण्यात आले. 

यावर्षीही आंदोलन 

याच लेंडी नाल्याकरिता मागील वर्षी गावक-यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर यांच्या नेतृत्वात अर्धनग्न आंदोलन केले होते. आता पुन्हा संतप्त प्रहारच्या कार्यकर्त्यांनी क्रांतिदिनी प्रदीप वडतकर यांच्या नेतृत्वात प्रेतयात्रा काढून आंदोलन केले. 

जीव मुठीत घेऊन करावी लागते रहदारी 

पावसाळ्याच्या दिवसात नादुरुस्त पुलावरून शेतक-यांना शेतीची कामे करण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागतो. या मार्गाने जीव मुठीत घेऊन रहदारी करावी लागत आहे. येवदा येथील हजारो शेतक-यांना शेतीची कामे तसेच शेतमालाची वाहतूक करण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग होत असल्याने या मार्गावरील पुलाचे तत्काळ बांधकाम होणे गरजेचे आहे. या दोन्ही पुलाचे बांधकाम जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने करावे, अशी मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली.

दरम्यान, प्रशासकीय अधिकारी अनुप कुलकर्णी, ग्रामसेवक निरंजन गायगोले, पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी झालेल्या चर्चेत प्रहारच्या प्रदीप वडतकर यांना वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे व पुलाचे बांधकाम लवकरच करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यावेळी गावातील नागरिक व प्रहारचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. ग्रामपंचायत कार्यालयात प्रेतयात्रा आंदोलनाची सांगता करण्यात आली.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com