दिग्रस : संजय राठोड, अशोक उईके विजयी| Election Results 2019

digras vidhan sabha election result sanjay rathod win
digras vidhan sabha election result sanjay rathod win

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघातून सेनेचे उमेदवार व राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड व राळेगावमधून भाजपचे प्राचार्य डॉ. अशोक उईके हे विजयी झाले आहेत. तर जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपचे उमेदवार यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून माघारले असून येथे जिल्ह्यातून एकमेव काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.

जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. यावेळी काँग्रेसकरिता अनुकूल स्थिती होती. परंतु, काँग्रेसने जुनेच चेहरे दिल्याने व त्यांनी निवडणुकीला सामोरे जाताना जुनीच पद्धत अवलंबल्यामुळे राळेगाव, आर्णी, उमरखेड व वणी या चार विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार माघारताना दिसत आहेत. तर, पुसद मतदारसंघातून भाजपचे ऍड. नीलय नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील नाईक यांनी 24 व्या फेरीअखेर 9701 मतांनी विजय संपादन केल्याची माहिती आहे. तसेच उमरखेडमधून भाजपचे नामदेव ससाने यांनी काँग्रेसचे विजय खडसे यांना अडीच हजार मतांनी मागे टाकले असून त्यांची विजयाकडे आगेकूच सुरू आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघातून सेनेचे उमेदवार व महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी 63 हजार 607 मतांनी विजय संपादन केला आहे. यावेळी त्यांचे मताधिक्‍य कमी झाले आहे. तर राळेगाव मतदारसंघातून भाजपचे उमेदवार व राज्याचे आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी काँग्रेसचे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांचा 10 हजार 141 मतांनी पराभव केला. तर, यवतमाळ विधानसभेत 18 व्या फेरीअंती काँग्रेसचे बाळासाहेब मांगूळकर 11784 मतांची आघाडी घेतली असून भाजपचे पालकमंत्री मदन येरावार यांना येथे विजयासाठी संघर्ष करावा लागत आहे. केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघातून 24 व्या फेरीअखेर भाजपचे डॉ. संदीप धुर्वे यांनी जवळपास 2700 मतांनी आघाडी घेतली आहे. तर, उमरखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नामदेव ससाने यांनी काँग्रेसचे उमेदवार विजय खडसे यांना मागे टाकून आघाडी घेतली आहे.

ऊर्जा राज्यमंत्र्यांचा विजयासाठी संघर्ष
जिल्ह्यातील सर्वांत जास्त जनतेचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या मतांकडे लक्ष लागलेले आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून ते उभे असून 18 व्या फेरीत त्यांना काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांनी मागे टाकले आहे. अजून 10 फेऱ्या बाकी असून येरावार विजयासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com