‘सकाळ’च्या ‘दीक्षा’ विशेषांकाचे आज लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रसार ‘दै. सकाळ’च्या ‘दीक्षा’ विशेषांकाच्या माध्यमातून होत आहे. १३ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. यावर्षी १४ व्या दीक्षा वार्षिकांकाचे प्रकाशन बुधवारी दीक्षाभूमीवरील दीक्षा मंडपात दुपारी चारला होणार आहे. भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते ‘दीक्षा’ अंकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी हा विशेषांक येथे विक्रीसाठी उपलब्ध असेल.

नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रसार ‘दै. सकाळ’च्या ‘दीक्षा’ विशेषांकाच्या माध्यमातून होत आहे. १३ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. यावर्षी १४ व्या दीक्षा वार्षिकांकाचे प्रकाशन बुधवारी दीक्षाभूमीवरील दीक्षा मंडपात दुपारी चारला होणार आहे. भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते ‘दीक्षा’ अंकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी हा विशेषांक येथे विक्रीसाठी उपलब्ध असेल. या प्रकाशन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘दै. सकाळ’तर्फे करण्यात आले आहे. 
संपर्क - रूपेश ९१३००९७५११

Web Title: Diksha Special Issue