दीक्षाभूमीच्या सुरक्षेवर सीसीटीव्हीचा "वॉच' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

नागपूर : दीक्षाभूमीवर होणाऱ्या धम्मदीक्षेच्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवस शहरात गर्दी होणार आहे. यामुळे नागपूर पोलिसांनी सुरक्षतेच्या दृष्टीने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. बंदोबस्ताची कमान पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय सांभाळत असून, दोन उपायुक्‍तांवर सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सोपवली आहे.

शहरात दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तनदिनाचा सोहळा साजरा होणार आहे. दीक्षाभूमीवर भारतातील कानाकोपऱ्यातून उपासक-उपासिका येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासाठी दोन उपायुक्‍त दर्जाचे अधिकारी, सात सहायक पोलिस आयुक्‍त, 24 पोलिस निरीक्षक, 85 सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 1,105 पोलिस कर्मचारी, 200 होमगार्ड, राज्य राखीव दलाचे 40 जवान, अतिजलद प्रतिसाद पथकाचे जवान तैनात राहणार आहे. दीक्षाभूमी परिसरात 55 सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. तसेच मिनी पोलिस कंट्रोल रूम तयार केला आहे. येथे सीसीटीव्ही लावण्यात आल्या आहेत. दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या चारही रस्त्यांवर वॉच टॉवर लावण्यात आले आहे.
सर्वप्रथम शहरवासीयांना दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या शुभेच्छा. दसरा, नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. 
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस आयुक्‍त. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dikshabhumi security news