Vidhan Sabha 2019 बंडखोर दिलीप बन्सोड यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

तिरोडा (जि. गोंदिया) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार माजी आमदार दिलीप बन्सोड यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तिरोडा पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर पारधी यांनी याबाबत माहिती दिली. उल्लेखनीय म्हणजे, बन्सोड यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही बंडखोरी केल्याने अधिकृत उमेदवाराला पराभूत करण्यात भाजपला सहकार्य केले होते, हे विशेष.

तिरोडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने रविकांत बोपचे यांची अंतिम क्षणी उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. यामुळे दिलीप बन्सोड हे कमालीचे अस्वस्थ झाले होते. नाराज बन्सोड यांची राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, बन्सोड यांनी त्या नेत्यांना न जुमानता आपली उमेदवारी कायम ठेवून पक्षालाच आव्हान दिले. यामुळे राष्ट्रवादी पक्षाने त्यांना पक्षातून निष्कासित केले असल्याची माहिती पारधी यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilip Bansode expelled from NCP