प्रा. दिलीप चौधरी म्हणतात, शेतकरी आत्महत्यामध्ये सर्वाधिक कुणबीच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

काटोल (जि. नागपूर) : महाराष्ट्रामध्ये अडीच लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि त्यामध्ये कुणबी समाजाच्या शेतकऱ्यांची संख्या सर्वांत जास्त आहे, असा दावा प्रा. दिलीप चौधरी यांनी केला. याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यासाठी कुणबी समाजाने कोणती राजकीय विचारधारा आपल्या समाजाचे भले करणार आहे, त्याचा विचार केला पाहिजे, असे आवाहनही केले.

काटोल येथील बाजार समितीच्या यार्डमध्ये रविवारी सर्व शाखीय कुणबी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर काटोल कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष रमेश फिस्के, डॉ. छाया महाले, अर्जुन शेटे, शंकरराव वाट, देवरावजी पातूरकर, सुरेश गुडधे, आशीष तायवाडे, प्रमोद वैद्य, बाळाभाऊ शिंगणे, अनंत भारसाकडे, पुरुषोत्तम शहाणे, स्वप्निल राऊत उपस्थित होते.
प्रा. डॉ. छाया महल्ले यांनी महिलांना संबोधित केले. त्या म्हणाल्या, स्त्रीयांनी कुणबी समाजात जन्माला आल्याचा अभिमान बाळगला पाहिजे. आपल्यातील सुप्त गुणांना ओळखून त्याला वाव देण्याची आज गरज आहे. तरुण तरुणींनी स्थिर कुटुंब टिकवण्याची गरज आहे. आधुनिकतेच्या नावावर घरची घरे उद्‌ध्वस्त होत आहेत. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सर्वच शाखेच्या कुणबी बांधव तसेच कुणबी सेवा संघाच्या सदस्यांनी मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilip Chowdhury says, farmer suicides are the biggest problem