नऊ हजारांवर दिव्यांग मतदार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

अमरावती : जिल्ह्याच्या आठ मतदारसंघांत 9 हजार 265 दिव्यांग मतदार असून दर्यापूर मतदारसंघात त्यांची संख्या सर्वाधिक 2 हजार 81 आहे. धामणगावरेल्वेत 1 हजार 540, बडनेऱ्यात 1 हजार 47, अमरावतीत 828, तिवश्‍यात 1 हजार 338, मेळघाटात 783, अचलपूरमध्ये 947 तर मोर्शीत 701 दिव्यांग मतदार आहेत. 
दर्यापूर मतदारसंघात सेनादलातील सर्वाधिक 932 मतदार असून अचलपूरमध्ये 456, तिवश्‍यात 419, धामणगावरेल्वेत 233, बडनेऱ्यात 266, अमरावतीत 281, मेळघाटात 314, तर मोर्शीत 381 असे एकूण 3 हजार 282 मतदार आहेत. 

जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांतील 2 हजार 628 मतदानकेंद्रांसाठी 4 हजार 324 बॅलेट युनिट, 3 हजार 168 कंट्रोल युनिट व 3 हजार 603 व्हीव्हीपॅट मशीन याप्रमाणे इव्हीएम यंत्रणा संबंधित मतदानकेंद्रांसाठी राहणार आहे. 3 हजार 282 सर्व्हिस मतदारांना ईटीपीबीएस बॅलेट पेपर वितरित करण्यात आले आहेत. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत "1950' क्रमांकाचा टोल-फ्री दूरध्वनी सुरू करण्यात आला आहे. हा टोल फ्री क्रमांक 24 तास कार्यान्वित राहणार असून मतदारयादीतील नाव शोधणे, निवडणुकीविषयक नागरिकांच्या अडचणी, मतदारयादीची माहिती, मतदारांच्या तक्रारींची दखल या माध्यमातून घेण्यात येणार असून तक्रारींचे तत्काळ निवारणसुद्धा करण्यात येणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disability voters at nine thousand