
शेगाव (जि.बुलडाणा) : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधुन जनजागृतीच्या हेतुने आविष्कार व्दारा संचालित श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयाव्दारे भव्य दिव्यांग दिंडींचे आयोजन मंगळवार (ता.3) करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराजांच्या पावन भूमीत निघालेल्या या दिव्यांग दिंडींनी नगरवासीयांचे लक्ष वेधले.
.
व्यावसायिक उपक्रम
विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम योगासन, नृत्य, वृक्षसंवर्धन, पर्यावरण तसेच व्यवसाईक दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांच्या पुनर्वसना करिता प्रसाद अंतर्गत चहा, नाश्ता, स्वयंपाक तयार करणे, मुर्तीकले अंतर्गत श्री गोबरगणेश मुर्ती, दिवे तयार करणे काफट व्दारे वस्तू तयार करणे, प्रिंटींग अंतर्गत स्कीन प्रिंटींग करणे, किफायत बाजार अंतर्गत फिनाईल, हॅन्डवॉश, डिशवॉश, फ्लोअर वॉश, डिटर्जन्ट पावडर तयार करणे या सर्व कलाकृतींचे प्रात्यक्षिक या दिव्यांग दिंडीमध्ये सादर करण्यात आले.
आमदार डॉ.संजय कुटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
श्री.ग.भी.मुरारका हायस्कूल येथे दिंडीचे उद्घाटन व श्रींच्या पालखीचे पूजन मान्यवर अतिथींचे हस्ते करून प्रस्थान गजानन सोसायटी मार्गे निदा हॉस्पिटल, बस स्टॅण्ड, अग्रसेन चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक मार्गे प्रस्थान करीत श्री गजानन महाराज मंदिरामध्ये समारोप करण्यात आला. याभव्य दिव्यांग दिंडीत जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे, भाजपा शहराध्यक्ष डॉ. मोहन बानोले, शरदसेठ अग्रवाल, राजेश अग्रवाल, विजूबाप्पू देशमुख, ज्ञानेश्वरआप्पा साखरे, विजय यादव, दिपक ढमाळ, नगराध्यक्षा शकुंतलाबाई बुच, माऊली गृपचे अध्यक्ष ज्ञानेश्वरदादा पाटील, प्रेमलता सोनोने, अल्काताई खानझोडे, ओम खेतान, अॅड. संजय पोकळे, प्रशांत देशमुख, गजानन हाडोळे, अविष्कार संस्थेचे गजानन वाघ, पुरूषोत्तम हाडोळे, अविनाश दळवी, पांडुरंग बुच, प्रदीप सांगळे, प्रिती शेगोकार, रजनी पहूरकर, ज्योती कचरे, वर्षा ढमाळ, मंदा घाटोळ आदीसह मान्यवर सहभागी झाले होते.
विविध संस्थांचा सहभाग
दिव्यांग दिंडीमध्ये शहरातील विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था तसेच शिक्षण संस्था श्री.ग.भि.मुरारका हायस्कुल व कॉलेज, माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स, सावली सेवा प्रकल्प, अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळ, नारी शक्ती संघटना, वारकरी मंडळ जवळा, ब्राम्हण समाज महिला मंडळ, सद्भावना महिला भजनी मंडळ, गायत्री परिवार, लॉयनेस क्लब, अंगणवाडी सेविका, रोटरी क्लब यांचा समावेश असून शहरातील समाजसेवक आपले योगदान व सहकार्य आहे.