आपत्ती व्यवस्थापन शिबिर, प्रशिक्षणावर लाखोंचा खर्च

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना सहा वर्षांपासून आपत्ती व्यवस्थापनाचे शिबिर आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे. ट्रेनिंगवर 90 लाख 40 हजारांचा निधी खर्च केल्याची माहिती उघडकीस आली आहे. कोल्हापूरचा पूर वगळता इतर ठिकाणी हे प्रशिक्षण कामी आले नसल्याने दिसून येते. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडेही देण्यात यावे यासाठी केंद्र सरकारकडून आदेश देण्यात आला होता. त्यानुसार विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण विविध शिबिरामार्फत देण्यात येतात.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना सहा वर्षांपासून आपत्ती व्यवस्थापनाचे शिबिर आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे. ट्रेनिंगवर 90 लाख 40 हजारांचा निधी खर्च केल्याची माहिती उघडकीस आली आहे. कोल्हापूरचा पूर वगळता इतर ठिकाणी हे प्रशिक्षण कामी आले नसल्याने दिसून येते. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडेही देण्यात यावे यासाठी केंद्र सरकारकडून आदेश देण्यात आला होता. त्यानुसार विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण विविध शिबिरामार्फत देण्यात येतात. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध महाविद्यालयात शिबिरांचे आयोजन करून त्यामध्ये तज्ज्ञांच्या मदतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. 2014 साली राजभवन येथे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे 1200 विद्यार्थी आणि शिक्षकांच्या शिबिराचे आयोजन केले होते. 10 दिवसीय शिबिरासाठी जवळपास 68 लाख 34 हजार 587 रुपयांचा खर्च केला होता. त्यानंतर 10 दिवसीय सहा शिबिरे तर तीनदिवसीय एक शिबिर घेण्यात आले आहे. शिवाय कोल्हापूरला आलेल्या पुरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मदतकार्य केले. त्यात जवळपास दोन लाखांचा खर्च आलेला आहे. असे प्रसंग बरेच कमी येत असल्याने केवळ प्रशिक्षणावरच पैसा खर्च केले जात असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अर्ज करून माहितीची विचारणा केली होती. आपत्ती व्यवस्थापनासाठी विद्यापीठाद्वारे दोन कोटी 40 लाख 85 हजार 528 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात असल्याचेही निदर्शनास आले आहे. सप्टेंबरपर्यंत 4 लाख 25 हजार 435 रुपयांचा निधी जमा केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disaster management camps, costing millions on training