उपसरपंचाविरोधातील अविश्‍वास ठराव खारीज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

टेकाडी, (जि. नागपूर): जुनी कामठी ग्रामपंचायतचे उपसरपंच भूषण इंगोले यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव पारित करण्यासंदर्भात 21 सप्टेंबरला विशेष सभेचे आयोजन केले होते. दरम्यान, नियमांचे कारण पुढे करीत तहसीलदार वरुण कुमार सहारे यांनी इंगोलेंविरोधात असलेला ठराव खारीज केल्याचे गुरुवारी पत्रकातून जाहीर केले आहे. यामुळे उपसरपंच भूषण इंगोले यांनी सुटकेचा श्‍वास घेतला. जुनी कामठी ग्रामपंचायत अंतर्गत नऊ सदस्य आणि सरपंच निवडून आले होते. नवनियुक्त सदस्यांनी भूषण इंगोले यांना उपसरपंच निवडले होते.

टेकाडी, (जि. नागपूर): जुनी कामठी ग्रामपंचायतचे उपसरपंच भूषण इंगोले यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव पारित करण्यासंदर्भात 21 सप्टेंबरला विशेष सभेचे आयोजन केले होते. दरम्यान, नियमांचे कारण पुढे करीत तहसीलदार वरुण कुमार सहारे यांनी इंगोलेंविरोधात असलेला ठराव खारीज केल्याचे गुरुवारी पत्रकातून जाहीर केले आहे. यामुळे उपसरपंच भूषण इंगोले यांनी सुटकेचा श्‍वास घेतला. जुनी कामठी ग्रामपंचायत अंतर्गत नऊ सदस्य आणि सरपंच निवडून आले होते. नवनियुक्त सदस्यांनी भूषण इंगोले यांना उपसरपंच निवडले होते. वादामुळे सरपंच मोहन खंडाते, ग्रामपंचायत सदस्य राहुल ढोके, नीलेश वयले, विनायक खंडाते, सुषमा खंते, सुषमा कावले, शुलभा उइके, माज्या मडावी यांनी उपसरपंच भूषण इंगोले यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव संदर्भात पारशिवनीचे तहसीलदार यांच्या समक्ष 12 सप्टेंबरला निवेदन सादर केले होते. तहसीलदारांनी 13 सप्टेंबरला माननीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी व ग्रामपंचायत सचिवांना पत्र पाठवून अविश्‍वास प्रस्तावासंदर्भात लक्ष केंद्रित केले.अविश्‍वास प्रस्ताव आणण्यासाठी तहसीलदारांद्वारे 21 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्याची नोटीस काढण्यात आली होती. नोटिशीवर भूषण इंगोले यांनी तहसीलदारांसमक्ष महाराष्ट्र शासनाचा 19 जुलै 2017 च्या जीआरचा हवाला देत सरपंच व उपसरपंचांच्या विरोधात दोन वर्षे पूर्ण होईस्तोवर सोबत ग्रामपंचायतचा कार्यकाल समाप्तीच्या सहा महिन्यांच्या आत अविश्‍वास प्रस्ताव घेतला जाऊ शकत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तहसीलदारांनी जीआरचा अभ्यास व सत्यता तपासून गुरुवारी तहसीलदार वरुण कुमार सहारे यांनी नोटीस काढून अविश्‍वास प्रस्तावसाठी बोलावलेली विशेष सभा रद्द केली. सोबत नोटिशीची प्रत बीडीओ पारशिवनी, कन्हानचे ठाणेदार, तलाठी व ग्रा. पं. सचिव जुनी कामठी यांना पाठवली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disbelief resolution against sub-division dismissed