जनसंवाद विभागप्रमुखांना विद्यापीठाने मागितला खुलासा! 

जनसंवाद विभागप्रमुखांना विद्यापीठाने मागितला खुलासा! 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद शाखेतील एम. ए. (मास कम्युनिकेशन) ऐवजी विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ मास कम्युनिकेशनची (एमएमसी) पदवी देण्यात आल्याच्या प्रकरणात विभागप्रमुखांना खुलासा मागविण्यात आला असल्याची माहिती आहे.

प्रकरणात 2016 पासून एम. ए. मास कम्युनिकेशन असे अभ्यासक्रमाचे नामकरण झाले असताना, 2018 च्या दीक्षान्त समारंभात मास्टर ऑफ मास कम्युनिकेशनची (एमएमसी) पदवी देण्यात आल्याचे समोर आले होते. 

नागपूर विद्यापीठात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशानुसार 2002 मध्ये जनसंवाद अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता दिली. विभागाने 2008-09 पासून पदव्युत्तर जनसंवाद पदवीस सुरुवात झाली. त्यावेळी अभ्यासमंडळाने "मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन' (एमएमसी) या नावाने त्याची सुरुवात केली. त्यावेळी पदवीही त्याच नावाने वाटप करण्यात आली. मात्र, कला शाखेत असल्याने या पदवीचे नाव एम.ए. (मास कम्युनिकेशन) असावे असा आक्षेप आल्याने 2014 साली तसे दिशानिर्देश काढून नावात बदल करण्यात आला. त्यानुसार 2016 साली विद्यार्थ्यांना "एम. ए. इन मास कम्युनिकेशन' या नावाने पदवी प्रदान करण्यात आली. मात्र, त्यानंतर 2017 आणि 2018 साली अचानक विद्यार्थ्यांना "मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन' या नावाने आंतरशाखीय विद्या शाखेतून पदवी प्रदान करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होण्याची शक्‍यता निर्माण झाली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, विद्यापीठाने विभागप्रमुख डॉ. धर्मेश धवनकर यांना विचारणा करून त्याबद्दल माहिती मागवित, खुलासा करण्याचे निर्देश दिल्याचे समजते. दरम्यान, याबद्दल प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना विचारणा केली असता, नेमका वाद काय हे माहिती नसल्याने त्यावर बोलता येणे शक्‍य नसल्याचे सांगितले. मात्र, त्याबद्दल माहिती घेणार असल्याचे ते म्हणाले. 

वादावर अधिष्ठातांचे मौन 
आंतरशाखीय विद्याशाखेत जनसंवाद अभ्यासक्रमाचा समावेश असल्याने त्यावर अधिष्ठाता डॉ. राजश्री वैष्णव यांना विचारणा केली असता, त्यांनी प्रशासनाकडून प्रकरण आल्यावरच त्यामध्ये नेमके काय? हे बघता येईल असे सांगितले. यापुढे काहीही सांगता येणे अशक्‍य असल्याचे शाखेच्या अधिष्ठाता डॉ. राजश्री वैष्णव यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com