जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न आता देशभरात

gadkari
gadkari

खामगाव : राज्याचे कृषी मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या दूरदृष्टीचा परिचय पुन्हा समोर आला आहे. सध्या ते आपल्यात नाहीत परंतु, मतदार संघाच्या शाश्वत विकासासाठी त्यांनी अंमलात आणलेल्या योजना व संकल्पना किती फायदेशीर व देशहिताच्या होत्या हे समोर आले आहे. परिसरातील तलाव, शेततळे, नदी, नाल्यामध्ये उत्खनन करुन त्याचे गौण खनिज रस्ता कामात वापरावे म्हणजे गौण खनिजाची बचत व पाणीसाठ्यात देखील मदत होईल या दृष्टीने ही संकल्पना खामगाव मतदार संघामध्ये राबविण्यात आली. याच संकल्पनेचा राज्यस्तरावर व देशपातळी देखील अमंल करावा या हेतुने त्यांनी देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील संपूर्ण माहिती देऊन पाठपुरावा केला होता. त्याच पाठपुराव्याचे यश की काय आता जनसरोवर योजना बाबतची  जाहीरात देशातील विविध वर्तमानपत्रात प्रकाशित झाली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी पुढकार घेतला आहे.

केंद्रामध्ये 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाची सत्ता आली त्यावेळी या सत्तेच्या माध्यमातून आपल्या खामगाव मतदार संघाचा शाश्वत विकास व्हावा या दृष्टीने स्व. भाऊसाहेब फुंडकर  यांनी शेतकरी, शेतमजुर सर्वसामान्य जनतेच्या खऱ्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी सदैव पुढकार घेतला. आ. अ‍ॅड.आकाश फुंडकर व सेवानिवृत्त इंजिनिअर व्ही.डी पाटील यांना आपल्या भागातील तलाव, नदी, नाले यांचा प्रोजेक्ट तयार करुन माहीती गोळा करण्यास सांगितली. आपल्या भागात अनेक समस्यां तोंड वर काढून उभ्या होत्या. परंतु  मुख्य समस्या होत्या त्या जलसंधारण व रस्ते वाहतुक जलस्त्रोत कोरडे पडलेले तर  रस्त्यांची चाळण झालेली.  

त्यामुळे जलयुक्त शिवार या योजनेअंतर्गत सर्वप्रथम मतदार संघातील छोट्या मोठ्या प्रकल्पांची कामे मार्गी लावली व यामधूनच निघणारा वापरण्या योग्य मुरम, गिट्टी इतरही गौण खनिज सर्वत्र होणाऱ्या रस्ताकामांमध्यें वापरण्यात येवू लागला व  गाळ देखील शेतांमध्ये वापरण्यात येवून शेतीची सुपिकता देखील वाढण्यास मदत झाली.  हीच संकल्पना स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी ना.नितीन गडकरी यांच्याकडे  मांडली होती.  तर तीच संकल्पना केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने स्विकारली असून स्व.भाऊसाहेबांच्या संकल्पनेतील जलसंधारणाचा 'खामगाव पॅटर्न' आता देशपातळीवर देखील राबविण्यात येणार आहे. व तशा  जाहीराती सुध्दा वृत्तपत्रांना झळकु लागल्या आहेत.

या संकल्पनेनुसार स्थानिक शेतकऱ्यांच्या संमतीने माती काढून शेततळे, तळे, कालवा आणि नाल्यांची निर्मिती आणि पुनरुज्जीवन करणे, विशेष म्हणजे माती काढण्याचा खर्च रस्ता बांधनाऱ्या कंपनीच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये पाण्याच्या मोठ्या साठवणूकीतून जलसमस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून केला जाणार आहे. स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या संकल्पनेतील ही योजना खरोखरच शेतकऱ्यांसह सर्वाच्यांच हिताची ठरणारी असून निश्चितच याचा फायदा शेतकऱ्यांसह जनसामान्यांना देखील होईल यात काहीच शंका नाही.

मिळालेल्या माहितीनुसार ज्या खामगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या कामात हा नवा प्रयोग राबवण्यात आला, त्या भागात २७  तलाव आणि १२ छोट्या नद्यांचे उत्खनन केले गेले. त्यातून तब्बल तीस लाख ७५ हजार घनमीटरची माती आणि मुरूम मिळाल्याने रस्त्यांचा खर्च तर वाचलाच; पण या भागातील जलस्रोतांची पाणी साठवण्याची क्षमता तब्बल १०७५ टीसीएमने वाढली. त्यामुळे पावसाळ्यात त्यात पाणी साठेल व त्याचा लाभ काही गावे व ३८ पाणीपुरवठा योजनांनाही मिळणार आहे. 

स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी राबविलेल्या संकल्पनेचा खामगाव मतदार संघातील जनतेला तर फायदा झालाच आहे. परंतु, कल्पना अंमलात आणली जाणार असल्याचा आनंद आहे.या निर्णयाबद्दल मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खामगाव मतदार संघातील नागरिकांच्या वतीने आभार मानतो. 
- अ‍ॅड. आकाश फुंडकर, आमदार खामगाव विधानसभा मतदार संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com