चिचोलीच्या आरोग्य केंद्रास अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा आजार

गैरसोयींनी युक्‍त चिचोलीचे प्राथमिक आरोग्य केंद्र
गैरसोयींनी युक्‍त चिचोलीचे प्राथमिक आरोग्य केंद्र

खापरखेडा (जि.नागपूर) : परिसरात असणाऱ्या चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रासह नागपूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या पदांमुळे आरोग्यसेवेत बाधा निर्माण होण्याची शक्‍यता बळावलेली आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण 49 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 316 उपकेंद्रे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अधिक वाचा- काय हो, अपक्षांची बंडखोरी कायम राहील का?

इतर उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांवर अधिकचा भार
या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत चिचोली, खापरखेडा, सिल्लेवाडा, वलनी, पोटा, भानेगाव, बिना (सं.), सुरादेवी आदी उपकेंद्रे येतात. या प्राथमिक आरोग्य केंद्राची लोकसंख्या सुमारे 70 हजार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकारी, औषधी संयोजक, आरोग्य सहायक, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, परिचर, वाहनचालक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नेत्रतंत्रज्ञ आदी अधिकाऱ्यांसह कर्मचारी आहेत. यामधील काही कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य केंद्र आजारी तर पडणार नाही ना, असा संतप्त सवाल परिसरातील रुग्ण करू लागले आहेत.

कर्मचा-यांवर अतिरिक्‍त प्रभार
एकीकडे परिसरातील संबंधित गावाच्या उपकेंद्राच्या मदतीने रोगांचा प्रतिबंध, आरोग्याचा प्रसार आणि आजारांवरचे उपचार करणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख कार्य आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली मुख्यालयांतर्गत चिचोली उपकेंद्र व खापरखेडा उपकेंद्रात आरोग्यसेविका महिलापद रिक्त तर वलनी उपकेंद्रात आरोग्यसेवक पुरुषपद रिक्त असल्याने इतर उपकेंद्रांतील कर्मचारी वर्गावर अतिरिक्त प्रभार आला आहे. या प्रकारानेही आरोग्यसेवेची गंभीर समस्या जाणवत असते.

अधिक वाचा - कोण बसेल या भंगार शिवशाही बसमध्ये?

रिक्‍त जागा कधी भरणार?

रुग्णांना आरोग्य कर्मचाऱ्यांअभावी खासगीत उपचार करावा लागत असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. एकीकडे चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्यसेविकेची अत्यंत गरज आहे. मात्र, उपकेंद्र चिचोलीस्तरावर आरोग्यसेविकेला काम करावे लागते. शिवाय चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, लसीकरण व इतर राष्ट्रीय कार्यक्रम यासह अन्य आरोग्यसेवाही पुरविल्या जातात. विशेष म्हणजे, ती चिचोली उपकेंद्राच्या कामासाठी आरोग्यसेविका असून, प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविकेची कमी असल्याने राष्ट्रीय आरोग्य मिशनद्वारे कंत्राटी तत्त्वावर पुन्हा एक आरोग्यसेविका पद देण्याची मागणी रुग्ण करू लागले आहेत. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रात स्टाफ नर्स राष्ट्रीय आरोग्य मिशनद्वारे कंत्राटी तत्त्वावर पद रिक्त असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

नागरिक त्रस्त

खापरखेडा परिसर औद्योगिक कारखान्यासाठी प्रसिद्ध असून प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त होतात. प्रदूषणामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहेत.
जयंत चौहान, मनसे उपजिल्हाध्यक्ष

आरोग्यसेवेला बाधा
प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली येथे उपकेंद्र इमारत नसून आरोग्यसेविका कर्मचाऱ्याचे पद नसल्याने गावात आरोग्यसेवा मिळणे कमी झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यसेवेला बाधा निर्माण झाली आहे.
कैलास शिंगणे, शिवसैनिक


डॉक्‍टरांचे पद मंजूर करा
ग्रामीण भागातील प्रत्येक उपकेंद्रात डॉक्‍टरांची नितांत गरज आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने प्रत्येक उपकेंद्रावर डॉक्‍टरचे पद मंजूर करावे.
रवींद्र चिखले, सरपंच भानेगाव

प्रसूतीतज्ज्ञाची गरज
चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नार्मल प्रसूती होत असते. अशावेळी बाळ कमजोर अथवा प्रसूत मातेला काही गंभीर प्रसंग आल्यास बालरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉक्‍टरची गरज असते.
नीता जालंदर, ग्रा. पं. सदस्य, चिचोली

स्थायी इमारत हवी
खापरखेडा उपकेंद्राला स्थायी इमारत नसल्याने फक्त आठवड्यातून एक दिवस लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी येतात व इतर दिवशी आरोग्यसेविकेची चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्यूटी लावण्यात येते. स्थायी इमारत असती तर परिसरातील अनेक रुग्णांना उपकेंद्रात प्राथमिक उपचार मिळाला असता.
कांताबाई परतेकी, सामाजिक कार्यकर्त्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com