नंदनवनमध्ये पत्नीच्या मैत्रिणीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

नागपूर : उपराजधानीत महिलांशी संबंधित गुन्हे सातत्याने उघडकीस येत आहेत. त्यात नव्याने विनयभंगाच्या दोन घटनांची भर पडली आहे. नंदनवन पोलिसांनी पत्नीच्या मैत्रिणीचा विनयभंग करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर, मामेबहिणीची छेड काढणाऱ्या आतेभावाला वाडी पोलिसांनी गजाआड केले आहे. अटकेतील आरोपी निवृत्ती पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा आहे.

आरोपी नितील बुलकर (34) रा. जुना सुभेदार ले-आउट याची पत्नी नंदनवन परिसरात राहणाऱ्या 35 वर्षीय पीडितेची मैत्रीण आहे. यामुळे दोघांचीही ओळख आहे. 2017 मध्ये आरोपीने पीडितेकडून अडीच लाख रुपये उधार घेतले होते. त्यातील 50 हजार रुपये परतही केले. त्यानंतर मात्र वेगवेगळी कारणे सांगून तो पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. पीडिता वेळोवेळी फोन करीत पैशांची मागणी करीत होती. 31 ऑक्‍टोबर रोजी दुपारी आरोपीने पीडितेला फोन केला. असभ्य भाषेत बोलून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

मामेबहिणीची छेड काढणाराही अटकेत
वाडी पोलिसांच्या अटकेत असणारा आरोपी विराज ऊर्फ किट्टू घोडकी (34) रा. वाडी नाका, आदिवासी सोसायटी हा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. तो संगणक आणि सीओजी तयार करून देण्याचे काम करतो. त्याची मामेबहिणीवर पूर्वीपासूनच वाईट नजर होती. ती 13 वर्षांची असतानापासून तो छेड काढीत होता. आता पीडिता 18 वर्षांची आहे. घटनेच्या दिवशीही आरोपी आपले काम करीत होता. पीडिता त्याच्या शेजारी जाऊन बसली. घरात कुणी नसल्याची संधी साधत त्याने असभ्य वर्तन केले. तिने आपल्या आईवडिलांना या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर वाडी ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disorder in wife's girlfriend