esakal | शेतीचा वाद विकोपाला, तब्बल एवढ्या जणांवर झाले गुन्हे दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Disputes between two groups over agricultural disputes

रिद्धपूर येथील पंकज लालसिंग पुनिया याने गावातील एका संस्थानच्या मालकीची शेती मक्‍त्याने घेतली. त्यावरून त्याचा संतोष ठाकरे यांच्या कुटुंबीयांसोबत वाद सुरू होता. त्याच कारणावरून वाद वाढला. काठ्या, कुऱ्हाडी, सळ्यांसह दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकून हल्ला केला. पंकज लालसिंग पुनिया यांच्या तक्रारीवरून संतोष ठाकरे, भूषण ठाकरे, गोलू ठाकरे, राजेंद्र ठाकरे, रवींद्र ठाकरे, गोपाळ मोरे या सहा जणांविरुद्ध शिरखेड पोलिसांनी गुहा दाखल केला.

शेतीचा वाद विकोपाला, तब्बल एवढ्या जणांवर झाले गुन्हे दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : मोर्शी तालुक्‍यात रिद्धपूरसह वरुड तालुक्‍याच्या अमडापूर गावात शेतीसह इतर क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये वाद विकोपास गेले. त्यामुळे या गावांमध्ये दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यात एकूण सात जण जखमी झाले असून, दोन्ही घटनांमध्ये 80 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.

रिद्धपूर येथील पंकज लालसिंग पुनिया याने गावातील एका संस्थानच्या मालकीची शेती मक्‍त्याने घेतली. त्यावरून त्याचा संतोष ठाकरे यांच्या कुटुंबीयांसोबत वाद सुरू होता. त्याच कारणावरून वाद वाढला. काठ्या, कुऱ्हाडी, सळ्यांसह दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकून हल्ला केला. पंकज लालसिंग पुनिया यांच्या तक्रारीवरून संतोष ठाकरे, भूषण ठाकरे, गोलू ठाकरे, राजेंद्र ठाकरे, रवींद्र ठाकरे, गोपाळ मोरे या सहा जणांविरुद्ध शिरखेड पोलिसांनी गुहा दाखल केला.

Video : शेतकरीपुत्राचा आविष्कार, जुगाड टेक्‍नॉलॉजीने शेतमशागत, वाचा सविस्तर...

परस्परविरुद्ध बाजूने संतोष ठाकरे यांनी तक्रार नोंदविली त्याआधारे पंकज पुनिया, लालसिंग पुनिया, दिलीप पुनिया, पन्नालाल चौधरी, सचिन चौधरी, विनोद चौधरी, रवी रोहिले, विजय रोहिले अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. वरुड तालुक्‍यातील अमडापूर गावातसुद्धा कौटुंबिक कारणावरून वाद होऊन दोन्ही गटातील लोक मोठ्या संख्येने एकमेकांपुढे उभे ठाकले. त्यांच्यात झटापट झाली. काहींनी काठीसह लोखंडी सळाखीने वार केले. अर्जुन देवीदास शिंदे (वय 22) युवकाच्या तक्रारीवरून एकूण 36 जणांविरुद्ध, तर संजय शिंदेच्या तक्रारीवरून 30 जणांविरुद्ध वरुड ठाण्यात गुन्हे दाखल केले.