रिक्षात कोंबले प्रवासी अन् दुचाकीस्वार बोलतात फोनवर

trafic
trafic

अकोला : शहरात एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी वैयक्‍तिक दुचाकी, चार चाकी वाहने किंवा ऑटोरिक्षावर अवलंबून राहण्याची वेळ आली. नव्या वसाहतीतील नागरिकांना मात्र, ऑटोरिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. याचाच फायदा घेऊन ऑटोरिक्षा चालक प्रवाशांना शेळ्या-मेंढ्याना कोंबताना दिसत आहेत.तर दुसरीकडे दुचाकीस्वार उबाड-खाबाड रस्त्यावर चक्क फोनवर बोलताना दिसून येतात. हे चित्र मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारे असेच आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयजिल्हा परिषद, न्यायालय, तसेच विविध कार्यालयांमध्ये शासकीय कामासाठी तसेच बाजार समितीत भाजीपाला विक्रीसाठी, खरेदीसाठी, बाजारपेठेतील कृषी केंद्र आदी ठिकाणी जाण्यासाठी शेतकरी, ग्रामस्थ बाहेरगावहून शहरात येतात. मात्र शहर बसची सोय नसल्याने ऑटोरिक्षात बसण्याशिवाय पर्याय राहात नाही. परिणामी रिक्षावाला सांगेल ते पैसे द्यावे लागतात. अर्थात या प्रवासात वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो. हा त्रास टाळण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना पालकांनी दुचाकी विकत घेऊन दिलेल्या आहेत. सतत अवजड वाहने या रस्त्यावरून जातात, अपघातही नित्याचे. परिणामी पालकांचा जीव सतत टांगणीला असतो. अनेकांच्या दुचाकीला अन्य वाहनांच्या धडक बसण्याचे प्रकार वारंवार होतात, काहींना यापुर्वी जीवही गमावावा लागलेला आहे. त्यामुळे पालकांना सतत पाल्यांची चिंता सतावत असते.

सर्वाधिक हाल विद्यार्थ्यांचेच
शहरातील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. विशेषत: विद्यार्थिनींना रिक्षाने प्रवास करण्याशिवाय अन्यथा पायी जाण्याशिवाय पर्याय राहात नाही. शेळ्या-मेंढ्यांसारखे या विद्यार्थ्यांना ऑटोत कोंबले जाते. याकडे ना पालकांचे लक्ष दिसून येत आहे ना शाळा-महाविद्यालय प्रशासनाचे.

खासगी वाहनांचे भाडे मनमानी
शहरात कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहनांचे वेगवेगळे दर आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यातून बस स्थानकापर्यंत आणि याच ठिकाणाहून कमी अंतरावर असलेल्या रेल्वे स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय आदी परिसरात जाण्यासाठी वेगळे भाडे प्रवाशांकडून,नागरिकांकडून आकारले जाते. शिवाय सौजन्यपुर्ण वागणूक मिळण्याचीही शाश्‍वती नसते.

दुचाकीस्वार बोलतात फोनवर!
शहरातील कारागृह ते रेल्वे स्थानकांपर्यंतच्या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असूनही अनेक दुचाकीस्वार या रस्त्यावर सुरू असलेल्या गाडीवरच फोनवर बोलताना दिसून येतात. विशेष म्हणजे काहीजण तर गाडीवर अख्खा परिवार घेऊन वाहन चालवित असताना फोनवर बोलताना दिसून येतात. यातून मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com