जे मध्यप्रदेश सरकारला जमले ते महाराष्ट्र सरकारला का जमू नये, पर्यटकांची नाराजी

Dissatisfaction among tourists against child tourism ban
Dissatisfaction among tourists against child tourism ban

नागपूर  ः  महाराष्ट्रात दहा वर्षांखालील मुलांना आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिलेल्या सूचनेनुसार निसर्ग पर्यटनाला बंदी आहे. मध्यप्रदेशने मात्र, निसर्ग पर्यटनाची ही अट शिथिल केली. त्यामुळे राज्यातील पेंचमधील पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांना प्रवेशद्वाराजवळून माघारी परतावे लागते. 'तो‘ नियम शिथिल करावा, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे. तशा तक्रारी वन विभागाला मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. हीच स्थिती राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात आहे.

राज्यात निसर्ग पर्यटन एक ऑक्टोबरपासून सुरू झाले. पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी आणि खुर्सापार या दोन्ही प्रवेशद्वारांतून पर्यटनाला गेलेल्यांना पर्यटकांना वाघांचे हमखास दर्शन होऊ लागले आहेत. या दोन्ही ठिकाणांवरून गेल्या पंधरा दिवसात दोन हजारांपेक्षा अधिक पर्यटकांनी जंगल सफारीचा आनंद लुटला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात अनेक दिवसानंतर घराबाहेर पडलेल्या निसर्गप्रेमींना हा सुखद धक्का आहे. 

मात्र, राज्य सरकारने अनलॉक पाचमध्ये अद्याप १० वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना निसर्ग पर्यटनाला बंदी घातली आहे. एनटीसीएने कोरोनाच्या काळात जून महिन्यात पत्र काढले होते. त्यात १० वर्षांखालील व ६५ वर्षांवरील पर्यटकांना जंगलातील पर्यटनाला बंदी घातली होती. आता सर्वत्र अनलॉक होत असून, मध्यप्रदेश शासनाने ‘तो‘ नियम शिथिल केला. त्यामुळे परिवारातील सर्वानाच निसर्ग पर्यटनाला आनंद लुटता येत आहे. 

परिणामी, तेथील पर्यटनाला बुस्ट मिळाला आहे. मात्र, महाराष्ट्रातील निसर्ग पर्यटनासाठी असलेल्या अटी शिथिल केल्या नाहीत. परिवारासह आम्ही गाडीत बसून येथे आलो तेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही, जिप्सीत बसल्यावर कोरोना कसा होईल असा सवालही यानिमित्ताने पर्यटक येथील उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारत आहे.

ते या प्रश्नाच्या उत्तरासाठी निःशब्द होत आहे. मध्यप्रदेशाच्या बाजूने सुरू केलेल्या महाराष्ट्रातील खुर्सापार प्रवेशद्वारावर नियमांचे पालन केले जात आहे. मध्यप्रदेशातील तुरीया प्रवेशद्वाराजवळ मात्र, कोणतेही बंधन नसल्याचे पर्यटक सांगत असून यानियमामुळे क्षेत्रिय कर्मचारीही अडचणीत सापडलेले आहेत.

महाराष्ट्रात दहा वर्षांखालील आणि ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांवर टाकलेली बंदी काढावी अशी मागणी करणारे अनेक पत्र वन विभागाला प्राप्त झालेले आहे. त्यामुळे पेंच व्याघ्र प्रशासनाने बंदी उठवण्याचा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव कार्यालयाला पाठविण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे. ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी तसा प्रस्ताव मुख्यालयात पाठवला आहे.
 

प्रवेशबंदीचा मुद्दा त्रासदायक
परिवारासह पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येण्याचा मनसुबा आखलेल्या पर्यटकांना दहा वर्षांखालील मुले व ज्येष्ठांना प्रवेश बंदीचा मुद्दा अतिशय त्रासदायक ठरू लागला आहे. त्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडत आहे. ही अट रद्द करावी, अशी मागणी होत आहे.
स्वानंद सोनी, सृष्टी रिसोर्ट, सिल्लारी 

संपादित - अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com