अरे व्वा ! मद्यविक्रीला राजाश्रय अन् कलिंडाला वनवास !

kalingad
kalingad

मूर्तिजापूर (जि. अकोला) : मद्यविक्री अन् मद्यपींची सोय करून देणाऱ्या प्रशासनाचे कृषीमाल विक्रीकडे दूर्लक्ष का ? असा सवाल आज शहरात उसळलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून उपस्थित केल्या जात आहे.

नियम पाळल्यास कोरोना पराभूत शक्य
गेले दोन दिवस पूर्ण लॉकडाउन ठेवल्यानंतर प्रशासनाच्या नियोजनातील सम-विषम दिवसांच्या संचारबंदीचे वेळापत्रक आजच्या उघडीपीने सुरू झाले. आजच्या उघडीपीचे वैशिष्ट्य ठरले मद्यविक्रीची सूट. दोन दिवस बंद असल्यामुळे बुधवारी सर्वत्र नागरिकांनी गर्दी केली. सोशल डिस्टन्सिंग संपल्याचा भास होईल इतपत घनता या गर्दीची होती. त्यातही मद्यविक्रीच्या दुकानांवरील गर्दी मात्र सोशल डिस्टन्सिंगचे बंधन पाळणारी आणि शिस्तीचं प्रदर्शन करणारी होती. असेच बंधन नागरिकांनी सर्वत्र पाळले, तर कोरोनाला पराभूत करणे दुरापास्त नसल्याच्या प्रतिक्रिया त्या निमित्याने उमटल्या. मात्र, त्याचवेळी प्रशासनाला अंतर्मुख करणारा एक प्रश्न देखील जाणकारांमधून उपस्थित केला गेला.

अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीला सम दिवशी चार तासांची सूट आणि मग लॉकडाउनमधील संचारबंदी. अन्य वस्तुंचे ठीक आहे, मात्र भाज्या आणि फळे विशेषतः उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात विक्रीला येणाऱ्या कलिंडासारख्या फळांमध्ये टिकाऊपणा नसतो. भाज्या आणि फळे विक्रीसाठी चार तासांचा मर्यादीत अवधी अपुरा ठरतो.

अशा फार काळ वैशाख वणव्यात टिकाव न धरणाऱ्या फळांची, भाज्यांची विक्री न होऊ शकल्यास ती खराब होऊन, आधीच आतबट्ट्याचा समजल्या जाणारा शेती व्यवसाय शेतकऱ्यांना आर्थिक गर्तेत आणतो. ही बाब विचारात घेऊन मद्यविक्रीबाबत दाखविल्या जाणारी सहानुभुती कृषी उत्पादक शेतकऱ्यांबाबतही दाखविली जावी, अशी मागणी जोर धरत आहे.

चार तासात माल विक्री होत नाही
शेतकरी बांधव कलिंगडांनी भरलेले ट्रॕक्टर व अन्य वाहने बाजारात आणतो. त्यांची पूर्णांशाने विक्री चार तासात होत नाही. उरलेला माल खराब होऊन शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. भाज्या व फळे विक्रीसाठी वेळ वाढवून मिळावी.
-अरुण बोंडे, शेतीचे अभ्यासक, मूर्तिजापूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com