जिल्हा बॅंकेचे सीईओ लाचेच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास एक लाखाच्या लाच मागण्याप्रकरणी अटक करण्यात आली. बुधवारी चंद्रपूरच्या पथकाने ही कारवाई केली. तारण ठेवलेल्या जमिनीची विक्री आणि खात्याचे नूतनीकरणास परवानगी देण्याच्या कामासाठी लाचेची मागणी केली होती. मारोती पोटे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार शेती, प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. जिल्हा बॅंकेच्या भद्रावती शाखेतून 2012 मध्ये शेतजमीन तारण ठेवून त्यांनी 45 लाख रुपयांचे वैयक्तिक कॅश क्रेडिट कर्ज घेतले आहे. तारण ठेवलेल्या जमीनीपैकी 1.5 एकर जमिनीची विक्री करण्याची आणि उर्वरित जमीन तारण ठेवून खात्याचे नूतनीकरण करण्याची परवानगी द्यावी म्हणून तक्रारदाराने बॅंकेच्या चंद्रपूर येथील मुख्य शाखेत 11 सप्टेंबरला अर्ज केला होता. दुसऱ्या दिवशी झालेल्या बॅंकेच्या मासिक सभेत अर्जाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर परवानगी पत्र देण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी मारोती पोटे यांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

त्यामुळे तक्रारदाराने याप्रकरणाची चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 29 सप्टेंबरला बॅंकेच्या मुख्यालयात पडताळणी करण्यात आली. तेव्हा पोटे यांनी एक लाखाची मागणी पंचासमक्ष केली. आज सापळा रचण्यात आला. सापळ्यादरम्यान पोटे यांनी रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. परंतु लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोटे यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

Web Title: District Bank Ceo Arrested in Bribe Case Crime