जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नियंत्रण कक्षाचा ताबा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

जिल्ह्यात पावसाने चांगला जोर धरला आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला. या काळात जिल्ह्यातील परिस्थितीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख स्वतः लक्ष ठेऊन आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात पावसाने चांगला जोर धरला आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला. या काळात जिल्ह्यातील परिस्थितीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख स्वतः लक्ष ठेऊन आहे.

बुधवारी (ता. ११) रात्री ११ ते १ वाजेपर्यंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात आकस्मिक भेट दिली. तब्बल एक तास सर्व जिल्ह्याचा आढावा घेतला व संबंधित अधिकारी-कर्मचारी वर्गाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला.

Web Title: The District Collector took control of the control room